Join us
Daily Top 2Weekly Top 5

आलिया भट अन् शर्वरी वाघ 'इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये? फोटो लीक झाल्यानंतर नेटकऱ्यांनी केलं जोरदार ट्रोल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 14:48 IST

'इंडियाज गॉट लेटेंट' सीझन २ च्या सेटवरून काही फोटो समोर आले आहे.

कॉमेडियन समय रैना याचा प्रचंड लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त ठरलेला टॅलेंट शो 'इंडियाज गॉट लेटेंट' सध्या पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आला आहे. या शोचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 'इंडियाज गॉट लेटेंट' सीझन २ च्या सेटवरून काही फोटो समोर आले आहे. ज्यात  अभिनेत्री आलिया भट आणि शर्वरी वाघ या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये पाहुणे म्हणून सहभागी झाल्याच पाहायला मिळालं.

'इंडियाज गॉट लेटेंट २'च्या सेटवरील हा फोटो लीक झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत. अनेकांना हा फोटो 'AI' (कृत्रिम बुद्धिमत्ता) द्वारे तयार करण्यात आल्याचा संशय आहे. मात्र, फोटोच्या बॅकग्राउंडला स्टेजवर एका बाजूला लिंबू आणि मिरची लटकलेली दिसत आहे, जे समय रैनाच्या सेटचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे हा फोटो खरा असून आलिया आणि शर्वरी या शोच्या पहिल्याच भागात पाहुण्या म्हणून दिसणार असल्याचे बोलले जात आहे. यश राज फिल्म्सच्या (YRF) आगामी 'अल्फा' या बिग बजेट ॲक्शन चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या 'अल्फा स्टार्स'ने इथे हजेरी लावल्याचे समजते.

आलिया आणि शर्वरीला समय रैनाच्या शोमध्ये पाहताच नेटकऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका युझरने लिहिले, "असे वाटते की 'इंडियाज गॉट लेटेंट' हा शो आता लवकरच केवळ चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी वापरले जाणारे एक माध्यम बनेल". दुसऱ्या एकाने आलियाला सल्ला देत लिहिले, "व्वा! आलिया आजकाल खरोखरच सर्वत्र दिसत आहे. सतत सर्वत्र दिसणे ही काही चांगली गोष्ट नाही". तर एका चाहत्याने नाराजी व्यक्त करत म्हटले, "यामुळे 'इंडियाज गॉट लेटेंट'मधून त्याचा मूळ गाभाच निघून जाईल आणि तो फक्त एक कमर्शियल शो उरेल".

१० जुलै २०२६ रोजी प्रदर्शित होणार 'अल्फा'

आलिया भट आणि शर्वरी वाघ यांच्या मुख्य भूमिका असलेला 'अल्फा' हा अत्यंत थरारक ॲक्शन-थ्रिलर चित्रपट १० जुलै २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आलिया आणि शर्वरी पहिल्यांदाच हाय-व्होल्टेज ॲक्शन करताना दिसणार असून त्यांच्यासोबत अनिल कपूर आणि बॉबी देओल हे देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलियाने थेट समय रैनाचा मंच निवडल्याने सध्या इंटरनेटवर चर्चांना उधाण आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Alia Bhatt and Sharvari Wagh on 'India's Got Latent 2'?

Web Summary : Alia Bhatt and Sharvari Wagh may appear on 'India's Got Latent 2' to promote their film 'Alpha'. This appearance sparks debate, with some fearing the show's commercialization.
टॅग्स :आलिया भटयु ट्यूब