आलिया भट सिनेसृष्टीतील सर्वात आघाडीची आणि टॅलेंटेड अभिनेत्री आहे. 'गंगुबाई काठियावाडी' सिनेमातला तिचा अभिनय पाहून तर सगळेच तिचे चाहते झाले. 'स्टुडंट ऑफ द इयर'मधून तिने पदार्पण केलं होतं. नंतर 'हंम्प्टी शर्मा की दुल्हनिया','कलंक','राझी' सारखे अनेक सुपरहिट सिनेमेही तिने दिले. सध्या आलिया भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर'सिनेमाच्या शूटमध्ये व्यग्र आहे. आजकाल ती एकावेळी एकच सिनेमा करत आहे. याचं कारण विचारलं असता तिने नुकतंच उत्तर दिलं आहे.
ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आलिया भट म्हणाली, "मी माझं करिअर टप्प्याटप्प्यात किंवा माइलस्टोन्समध्ये मोजत नाही. आधी मी ज्याप्रकारे सिनेमे निवडायचे तसेच मी आजही निवडते. नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करते, स्वत:लाच नवी आव्हानं देते आणि सतत स्वत:ला कम्फर्ट झोनमधून बाहेर काढते."
ती पुढे म्हणाली, "जर काही बदललं असेल तर तो आहे कामाचा वेग. कारण आता मला एक मुलगी आहे. माझ्यासाठी सध्या मी ज्या वेगाने काम करतेय तेच कंफर्टेबल आहे आणि मी त्यात खूश आहे. मला एकावेळी एकच सिनेमा करायचा आहे आणि त्यातच संपूर्ण एनर्जी गुंतवायची आहे. आधी मी एकावेळी दोन तीन सिनेमे करायचे, पण आता मला तसं करायचं नाही."
मी निर्मितीतही उतरले आहे. नवीन प्रोजेक्ट्सवर आम्ही काम करतोय जे पुढील वर्षी येईलच. मी या प्रक्रियेत क्रिएटव्हली गुंतले आहे. त्यामुळे मी स्वत:ला क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणते. करिअरविषयी बोलायचं तर माझ्या मनात आधी जे येतं ते मी करते."