आलिया भट सध्या तिच्या चित्रपटांसोबत रणबीर कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळेही चर्चेत आहे. पण सध्या आलिया तिच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. ऐरवी आलिया चाहत्यांसोबत सौजन्याने वागताना दिसते. मात्र नुकतेच असे काही झाले की, आलिया तिच्या बॉडीगार्डवर जाम भडकली.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत आलिया तिच्या फिल्मच्या सेटवर दिसतेय. तिचे बॉडीगार्ड आधीपासून तिची प्रतीक्षा करत आहेत. काहीच क्षणात आलियाची गाडी थांबते आणि बॉडीगार्ड लगेच तिच्याभोवती सुरक्षा कडे बनवतात. आलिया कारमधून उतरते आणि मीडियाकडे पाहून एक क्यूट स्माईल देत पुढे जाऊ लागते. पण यादरम्यान तिचे बॉडीगार्ड तिच्या पुढे निघतात. अर्थात आलिया मागे राहिली हे लक्षात येतात बॉडीगार्ड पुन्हा लगेच मागे येतात. बॉडीगार्डची चूक पाहून आलिया भडकते आणि बॉडीगार्डला फैलावर घेते.
क्षुल्लक कारणावरून बॉडीगार्डवर संतापली आलिया भट; लोक म्हणाले,‘रणबीर इफेक्ट’
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 13:10 IST
ऐरवी आलिया चाहत्यांसोबत सौजन्याने वागताना दिसते. मात्र नुकतेच असे काही झाले की, आलिया तिच्या बॉडीगार्डवर जाम भडकली.
क्षुल्लक कारणावरून बॉडीगार्डवर संतापली आलिया भट; लोक म्हणाले,‘रणबीर इफेक्ट’
ठळक मुद्देआलिया सध्या ‘ब्रह्मास्त्र’, ‘सडक’ आणि ‘आरआरआर’ या चित्रपटात बिझी आहे.