Join us  

आलिया भट्टच्या एअरपोर्ट लूकवर सारेच फिदा, जाणून घ्या त्या ड्रेसची किंमत आणि खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 12:56 PM

. बॉलीवुडच्या प्रत्येक सेलिब्रिटीची स्टाईल आणि फॅशन हटके आहे. त्यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो अभिनेत्री आलिया भट्टचा. सौंदर्यासह आपल्या हटके स्टाईलसाठी आलिया प्रसिद्ध आहे.

फॅशन आणि स्टाईलबाबत सेलिब्रिटी मंडळी फारच सजग असतात. त्यातच एखादी बड्या व्यक्तीची पार्टी किंवा मोठा इव्हेंट असेल तर सेलिब्रिटी आपल्या स्टाईलबाबत फारच चोखंदळ असल्याचे पाहायला मिळते. बॉलीवुडच्या प्रत्येक सेलिब्रिटीची स्टाईल आणि फॅशन हटके आहे. त्यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो अभिनेत्री आलिया भट्टचा. सौंदर्यासह आपल्या हटके स्टाईलसाठी आलिया प्रसिद्ध आहे. 

स्टाइल हा प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू असतो.आलिया भट्ट आपली फॅशन आणि स्टाईलबाबत बरीच सजग आहे. ती कुठल्याही कार्यक्रमात जाते तिथे आपल्या हटके फॅशन आणि स्टाईलने साऱ्यांच्याच नजरा आकर्षित करून घेते. रिल लाईफ असो किंवा रिअल आलियाच्या स्टाईलवर सारेच फिदा असतात.

नुकतंच आलिया एरअरपोर्टवर दिसली यावेळी डेनिम जॅकेटसह क्रॉप टॉप परिधान केलेल्या आलियाच्या स्टायलिश अंदाजाने सा-यांच्याच नजरा आकर्षित केल्या होत्या.  डेनिम जॅकेट रु. 8,290 किंमत असून जॉगर्सची  जवळपास  5,990 रूपये तर  इतकी आहे. याआऊटफिटमध्ये आलियाचे सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचे पाहायला मिळालं.  

आलिया भट्टने रणबीर कपूर राहतो त्या बिल्डींगमध्ये खरेदी केलं घर? किंमत वाचून व्हाल अवाक्...

मीडिया रिपोर्ट्सनुसार,आलिया भट्टने हे अपार्टमेंट ३२ कोटी रूपयांना खरेदी केलं आहे. आलियाचं हे नवं अपार्टमेंट २४६० स्क्वेअर फूटाचं आहे आणि पाचव्या मजल्यावर आहे. रणबीरचं घर याच अपार्टमेंटमध्ये ७व्या मजल्यावर आहे. एकूण १२ मजली ही इमारत कपूर फॅमिलीच्या कृष्णा राज बंगल्याच्या जवळच आहे. तशी आलिया सध्या बहीण शाहीन भट्टसोबत जुहूमध्ये राहते आणि आता ती लवकरच नव्या घरात शिफ्ट होणार असल्याचं समजतं. 

आलियाने आपल्या नव्या घरात हवन आणि लक्ष्मी पूजन केलं होतं. ज्यात परिवारातील लोकांसोबतच रणबीर कपूर, करण जोहर आणि अयान मुखर्जी उपस्थित होते. या घरासोबतच आलियाने याआधी जुहूमध्ये १३.११ कोटी रूपयाचं अपार्टमेंट खरेदी केलं होतं. दरम्यान, आलिया आणि रणबीरचा 'ब्रम्हास्त्र' सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

 

पुढील वर्षी हा सिनेमा रिलीज होऊ शकतो. तसेच या सिनेमाचं बजेट ३०० कोटींपेक्षा अधिक गेल्याचं नुकतंच मेकर्सनी सांगितलं. तसेच हा बॉलिवूडमधील सर्वात मोठा सिनेमा असल्याचं सांगितलं होतं.

टॅग्स :आलिया भट