बॉलिवूडचा 'धुरंधर' अभिनेता अक्षय खन्नाने २८ मार्च रोजी आपला वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी त्याच्या आगामी 'महाकाली' (Mahakali) या चित्रपटाच्या सेटवरून एक विशेष फोटो समोर आला आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना हा अत्यंत शक्तिशाली आणि पौराणिक पात्र असलेल्या 'असुरगुरू शुक्राचार्य' यांची भूमिका साकारत आहे. 'धुरंधर'मधील 'रहमान डकैत'नंतर शुक्राचार्यांच्या भूमिकेत अक्षय खन्नाचं बदलतं रुप पाहून सगळेच थक्क झाले आहेत.
कसा आहे अक्षयचा लूक?
दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये अक्षय खन्ना एका वेगळ्याच अवतारात दिसत आहे. लांब पांढरी दाढी, विस्कटलेले केस आणि अंगावर साधू-संतांसारखी वस्त्रे अशा गेटअपमध्ये तो ओळखताही येत नाहीये. अक्षयचा चेहरा नीट दिसत नसला तरी हे पात्र किती प्रभावी असेल, याचा अंदाज येतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन पूजा अपर्णा कोल्लुरू करत असून अक्षयने यातील आपल्या भागाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे.
प्रशांत वर्मा सिनेमॅटिक युनिव्हर्सचा भाग
'महाकाली' हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांच्या 'प्रशांत वर्मा सिनेमॅटिक युनिव्हर्स' (PVCU) चा एक महत्त्वाचा भाग आहे. ज्याप्रमाणे 'हनु-मान' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता, त्याच धर्तीवर आता 'महाकाली'ची निर्मिती केली जात आहे. अक्षय खन्ना या चित्रपटाद्वारे तेलगू सिनेसृष्टीत आपले पाऊल ठेवत आहे.
प्रशांत वर्मा यांची खास पोस्ट
अक्षय खन्नाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना प्रशांत वर्मा यांनी लिहिले, "वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अक्षय सर! तुम्ही एक असे कलाकार आहात ज्यांना प्रसिद्धीच्या झगमगाटाची गरज नाही, तुमचे कामच सर्व काही बोलते. तुमच्यासोबत काम करणे हा एक मोठा सन्मान आहे. आम्ही काय तयार केले आहे हे जगाला दाखवण्यासाठी मी आता अधिक काळ वाट पाहू शकत नाही."
यशस्वी घोडदौड सुरूच
अक्षय खन्ना नुकताच रणवीर सिंगच्या 'धुरंधर' या चित्रपटात 'रेहमान डकैत'च्या भूमिकेत दिसला होता, ज्याचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. आता 'महाकाली' मधील त्याची ही पौराणिक भूमिका त्याच्या करिअरला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून चाहते अक्षयला शुक्राचार्यांच्या रूपात पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
Web Summary : Akshay Khanna's 'Mahakali' look as Shukracharya stuns fans after his 'Rahman Dakait' role. Director Prasanth Varma shared the first look. Khanna debuts in Telugu cinema with this PVCU film.
Web Summary : अक्षय खन्ना का 'महाकाली' में शुक्राचार्य का लुक देखकर फैंस हैरान हैं। निर्देशक प्रशांत वर्मा ने पहला लुक साझा किया। खन्ना इस PVCU फिल्म से तेलुगु सिनेमा में डेब्यू कर रहे हैं।