होय, आई ट्विंकल खन्ना हिच्या पावलावर पाऊल टाकत आरवने हातात लेखणी घेतली आहे. आरव लवकरच एक यंग अॅडल्ट नॉवेल लिहिणार आहे. या नॉवेलबद्दल आणखी सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही. पण वडिल अक्षयसारखे गुड लुक्स आणि आई ट्विंकल खन्ना हिच्यातील साहित्यिकाचे गुण आरवमध्ये पुरेपूर उरलेले आहेत. त्यामुळे आरवचा हा डेब्यू चांगलाच इंटरेस्टिंग असणार यात काहीही शंका नाही. आरवच्या या पुस्तकाची आम्हाला प्रतीक्षा असेल.
ALSO READ: पुन्हा मिस्ट्री गर्लसोबत चेहरा लपविताना दिसला अक्षयकुमारचा मुलगा आरव !
आरव कायम आपल्या मित्रांसोबत दिसतो. मीडियासमोर येताच आरव आपला चेहरा लपवताना दिसतो. कदाचित आरव स्वभावाने काहीसा लाजरा आहे. पण मम्मा ट्विंकल खन्नाचे मानाल तर, आरवचा सेन्स आॅफ ह्युमर खूप चांगला आहे. कदाचित म्हणूनच आरवने इतक्या लहान वयात पुस्तक लिहायला घेतले आहे. अक्षय कुमारप्रमाणेच आरव सुद्धा मार्शल आर्ट शिकला आहे. खरे तर अक्षयप्रमाणेच आरवलाही मोठ्या पडद्यावर पाहण्यास चाहते उत्सूक आहेत. पण आता आरवने वेगळीच वाट निवडलीयं म्हटल्यावर त्याला शुभेच्छा तर द्यायलाच हव्यात ना.