Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय कुमार सज्ज! पुन्हा करणार ‘हेराफेरी’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 18:32 IST

काही दिवसांपूर्वी इंद्रकुमार यांनी सोशल मीडियावर चाहत्यांना एक गोड बातमी दिली होती. ही बातमी होती,‘हेराफेरी3’बद्दलची. होय, ‘हेराफेरी3’ हा चित्रपट येणार, असे ट्विट त्यांनी केले होते. 

काही दिवसांपूर्वी इंद्रकुमार यांनी सोशल मीडियावर चाहत्यांना एक गोड बातमी दिली होती. ही बातमी होती,‘हेराफेरी3’बद्दलची. होय, ‘हेराफेरी3’ हा चित्रपट येणार, असे ट्विट त्यांनी केले होते. अर्थात त्यांच्या या ट्विटनंतर या चित्रपटाबद्दलची कुठलीचं नवी घडामोड कानावर आली नव्हती. ‘हेराफेरी’सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांना याबद्दल विचारले असता, असे माझ्याही कानावर आलेय, केवळ एवढेचं त्यांनी सांगितले होते. त्यामुळे ‘हेराफेरी3’ कधी येणार, यात कोणत्या कलाकारांची वर्णी लागणार? असे प्रश्न अनुत्तरीत होते. पण आता बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. होय, अलीकडे ‘गोल्ड’च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये अक्षय कुमारने ‘हेराफेरी3’ बनणार, हे स्पष्ट केले. येत्या काळात मी ‘हाऊसफुल4’,‘हेराफेरी3’ असे अनेक चित्रपट करतोय, असे तो एका प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हणाला. अक्षयच्या या उत्तरावरून एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे, ‘हेराफेरी3’साठी अक्षयने परवानगी दिली आहे. त्यामुळे ‘हेराफेरी’सीरिजचे चाहते पुन्हा एकदा अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या त्रिकुटाला ‘हेराफेरी3’त पाहू शकणार आहेत. ‘हेराफेरी’ व ‘हेराफेरी2’ हे दोन्ही विनोदी चित्रपट लोकांनी डोक्यावर घेतले होते.

टॅग्स :अक्षय कुमार