बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये अक्षय कुमारचं नाव घेतलं जातं. त्याचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. आज बुधवार, १ एप्रिल २०२६ रोजी अक्षय कुमारने उज्जैन येथील बाबा महाकाल मंदिरात जाऊन दर्शन घेतले. विशेष म्हणजे, यावेळी त्याच्यासोबत त्याची सासू आणि दिग्गज अभिनेत्री डिंपल कपाडियादेखील होती. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अक्षय आणि डिंपल कपाडिया यांनी पहाटे बाबा महाकालच्या दरबारी हजेरी लावली. दोघांनीही विधीवत पूजा-अर्चा करून भगवान शंकराचे आशीर्वाद घेतले. अक्षय आणि डिंपल कपाडिया अत्यंत साध्या वेशात भक्तीत तल्लीन झालेले दिसून आले. दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना अक्षय भावुक झाला. तो म्हणाला, "मी येथे माझ्या कुटुंबासाठी आणि विशेषतः माझ्या देशासाठी प्रार्थना केली आहे. आपला देश सदैव प्रगतीपथावर राहो आणि सर्व नागरिक सुखी-समृद्ध व्हावेत, हेच साकडं मी महाकालच्या चरणी घातलं आहे".
'भूत बंगला' प्रदर्शनाची तारीख
अक्षय कुमार लवकरच आगामी हॉरर कॉमेडी चित्रपट 'भूत बंगला'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. हा एक हॉरर-कॉमेडी चित्रपट असून अक्षयला पुन्हा या अवतारात पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत. यात अक्षय कुमार सोबत परेश रावल, तब्बू, वामिका गब्बी, मिथिला पालकर, जिशु यू. सेनगुप्ता, मनोज जोशी आणि राजपाल यादव यांच्या देखील भूमिका पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख १० एप्रिल निश्चित करण्यात आली आहे, तरीही 'धुरंधर: द रिव्हेंज'चे यश पाहून १७ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याबाबतही चर्चा सुरू आहे.
Web Summary : Akshay Kumar, with Dimple Kapadia, visited Ujjain's Mahakal Temple. They prayed for the nation's progress and the well-being of its citizens. Kumar's upcoming horror-comedy, 'Bhoot Bangla,' is set for release, possibly on April 17th.
Web Summary : अक्षय कुमार, डिंपल कपाड़िया के साथ, उज्जैन के महाकाल मंदिर गए। उन्होंने देश की प्रगति और नागरिकों की भलाई के लिए प्रार्थना की। कुमार की आगामी हॉरर-कॉमेडी, 'भूत बंगला', रिलीज होने के लिए तैयार है, संभवतः 17 अप्रैल को।