Join us

कामातून ब्रेक घेऊन अक्षय कुमार चालला ख्रिसमस व्हेकेशनवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 12:58 IST

डिसेंबर महिना  सुरु झाला की सगळ्यांना वेध लागतात ख्रिसमस व्हेकेशनचे यात बॉलिवूडमधील मंडळी सुद्धा काही मागे नाहीत. अक्षय कुमार ...

डिसेंबर महिना  सुरु झाला की सगळ्यांना वेध लागतात ख्रिसमस व्हेकेशनचे यात बॉलिवूडमधील मंडळी सुद्धा काही मागे नाहीत. अक्षय कुमार एक महिन्याची सुट्टी घेऊन कुटुंबीयांसह परदेशात चालला आहे. अक्षय नेमका कुठे चलला आहे हे अजून कळले नाही. अक्षयचा आगामी चित्रपट पॅडमॅनचा ट्रेलर सुद्धा लाँच करण्यात आला आहे. पॅडमॅनची शूटिंग सुद्धा अक्षय कुमारने पूर्ण केली. पॅडमॅनमध्ये अक्षयसोबत राधिका आपटे आणि सोनम कपूर असणार आहे. केवळ इतकेच नाही तर, या चित्रपटासोबत अक्षयची पत्नी टिष्ट्वंकल खन्ना निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवतेय. हा चित्रपट टिष्ट्वंकलने प्रोड्यूस केलेला आहे. चित्रपटात राधिका अक्षयच्या पत्नीच्या भूमिकेत असेल; तर सोनम अक्षयची लव्ह इंट्रेस्ट असेल. महानायक अमिताभ बच्चन हेदेखील चित्रपटात भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहेत.चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अक्षय वेगवेगळ्या पद्धतीने पॅड बनवताना दिसत आहे. पण हा त्याचा प्रयोग त्याच्या पत्नीला म्हणजेच राधिका आपटेला रुचलेला नाहीये. त्यामुळे त्याची पत्नी त्याला सोडून निघून गेल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे तर सोनम त्याला या त्याच्या प्रयोगात मदत करताना आपल्याला दिसत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्यांने पांढरा पायजामा आणि पांढरा शर्ट अशा वेषात अक्षय दिसला होता. सुपर हिरो है ये पगला असे या पोस्टरवर लिहिलेले होते. आर. बल्की दिग्दर्शित हा चित्रपट २६ जानेवारी २०१८ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘पॅडमॅन’ हा चित्रपट अरुणाचलम मुरुगनाथम यांच्या जीवनाचा संघर्ष व स्वस्त सॅनिटरी पॅड तयार करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत दाखविण्यात येणार आहे. अ‍ॅक्शन हिरो म्हणून ओळख मिळविणाºया अक्षय कुमारने मागील काही वर्षांपासून आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून समीक्षकांचे लक्ष वेधले आहे. या दरम्यान त्याने काही वेगळ्या धाटणीचे चित्रपट केले आहेत. त्याचा‘पॅडमॅन’ हा याच मालिकेतील चित्रपट आहे.  तसेच अक्षय ‘2.0’ या चित्रपटात रजनीकांत आणि एमी जॅक्सनसोबत दिसणार आहे. ‘२.०’ हा सायन्स फिक्शन चित्रपट असून, त्यामध्ये अक्षय जबरदस्त खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.