अक्षय कुमार आजघडीला सर्वाधिक बिझी स्टार्सपैकी एक आहे. सध्या तो रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात बिझी आहे. अर्थात इथपर्यंतचा अक्षयचा प्रवास सोपा नव्हता. अक्षयला लहानपणापासून अभिनयाचे वेड होते. पण या स्वप्नाचा पाठलाग करताना अक्षयला अनेक नकार पचवावे लागले. सुरुवातीच्या स्ट्रगल काळातील एक किस्सा अक्षयने एका मुलाखतीत ऐकवला होता.आधी अक्षयने मॉडेल बनण्यासाठी धडपड केली होती. वडिलांना त्याने या क्षेत्रात यावे हे मान्य नव्हते. म्हणून त्याने वडिलांपासून लपवून आणि स्वत: पैसे जमवून स्टुडिओमध्ये एक फोटो काढला होता. या फोटोवर आपल्याला काम मिळेल, अशी त्याची अपेक्षा होती. त्यामुळे, हा फोटो घेऊन अक्षय अनेक मॉडेलिंग एजन्सीजमध्ये फिरला. फोटो दाखवून काम मागू लागला. पण एजन्सीवाले त्याचा हा फोटो पाहताच त्याला रिजेक्ट करायचे. अक्षयने खुद्द फारुख शेखच्या ‘जीना इसी का नाम है’ हे सांगितले होते.
पुढे काही चित्रपटात अगदी काही सेकंदाच्या भूमिकाही केल्यात. पण १९९१ मध्ये त्याच्या नशीबाने कलाटणी घेतली आणि लीड अॅक्टर म्हणून त्याचा पहिला चित्रपट ‘सौगंध’ रिलीज झाला.
खरे ती लीड अॅक्टर म्हणून अक्षयने सर्वात आधी ‘दीदार’ साइन केला होता. पण ‘सौगंध’ आधी रिलीज झाला होता. त्यामुळे हा त्याचा डेब्यू चित्रपट मानला जातो.