Join us  

अक्षय कुमार लढवणार का लोकसभेची निवडणूक?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 3:30 PM

अक्षय कुमार लवकरच राजकारणात प्रवेश करणार असून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर अक्षय लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचे म्हटले जात होते.

ठळक मुद्देलोकसभेची निवडणूक लढवण्याचा तुमचा काही प्लान आहे का असे त्याला विचारले असता त्याने सांगितले की, मी कोणतीही निवडणूक लढत नाहीये.

सध्या निवडणुकीचे वारे सगळीकडे वाहत आहेत. प्रत्येकजण आपल्या निवडणुकीच्या प्रचाराला लागला आहे. या निवडणुकीच्या रिंगणात काही अभिनेते देखील उतरले आहेत. लोकसभेची ही निवडणूक अभिनेता अक्षय कुमार देखील लढणार असल्याच्या बातम्या गेल्या कित्येक दिवसांपासून मीडियात येत होत्या. पण या सगळ्या केवळ अफवा असल्याचे स्वतः अक्षय कुमारने नुकतेच सांगितले आहे.

अक्षय कुमार लवकरच राजकारणात प्रवेश करणार असून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर अक्षय लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचे म्हटले जात होते. पण दिल्लीमध्ये केसरी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये अक्षयने या गोष्टीबाबत उलगडा केला आहे. लोकसभेची निवडणूक लढवण्याचा तुमचा काही प्लान आहे का असे त्याला विचारले असता त्याने सांगितले की, मी कोणतीही निवडणूक लढत नाहीये.

इंडिया टुडेने याबाबत अक्षयशी बातचित केली असता त्याने सांगितले की, राजकारण हा माझा अजेंडा नाहीये. मी माझ्या चित्रपटांद्वारे जी गोष्ट करू शकतो, ती कधीच राजकारणाद्वारे करू शकत नाही असे मला वाटते. 

भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर अमृतसर येथून अक्षय निवडणूक लढणार असल्याच्या अफवा गेल्या कित्येक दिवसांपासून पसरल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्वीट केले होते. त्यात त्यांनी अक्षय कुमार, शाहरुख खान, आमिर खान तसेच अनेक प्रसिद्ध व्यक्तींना टॅग केले होते आणि या ट्वीटद्वारे तुम्ही लोकांना लोकसभेच्या निवडणुकीत मोठ्या संख्येने मतदान करण्यास प्रोत्साहन करा असे सांगितले होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या ट्वीटवर अक्षयने रिप्लाय देत लिहिले होते की, तुम्ही योग्यच बोललात. लोकांच्या मतदानावरच लोकशाही अवलंबून असते. आपला देश आणि नागरिक यांच्यातील सुपरहिट प्रेमकथा मतदानाद्वारे बनण्याची गरज आहे. 

 

अक्षय लवकरच प्रेक्षकांना केसरी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत परिणिती चोप्रा मुख्य भूमिकेत असून या चित्रपटातील त्याचा लूक त्याच्या आजवरच्या चित्रपटांपेक्षा खूपच वेगळा आहे. 

टॅग्स :अक्षय कुमारभाजपानरेंद्र मोदी