Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षयने 'जॉली एलएलबी ३'मध्ये या अभिनेत्याची भूमिका केली कट? ओटीटी रिलीजनंतर उघडकीस आला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 12:50 IST

Jolly LLB 3 Movie : अभिनेता अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांचा चित्रपट 'जॉली एलएलबी ३' नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील एका सहायक अभिनेत्याने खुलासा केला आहे की, थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित असताना अक्षय कुमारने त्याचा रोल कट केला होता. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, जाणून घेऊया

चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केल्यानंतर, आता 'जॉली एलएलबी ३' चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, अर्शद वारसी आणि गजराज राव यांसारख्या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. आपल्या उत्कृष्ट कथा आणि स्टार कास्टच्या दमदार अभिनयाच्या जोरावर व्यावसायिकदृष्ट्या 'जॉली एलएलबी ३' यशस्वी ठरला. ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर 'जॉली एलएलबी ३' मधील एका सहायक अभिनेत्याने दावा केला आहे की, थिएटर रिलीजदरम्यान अक्षय कुमारने त्याचा रोल कट केला होता. याबाबत त्या अभिनेत्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. 

खरेतर 'जॉली एलएलबी ३' ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर अभिनेता आयुष, जो एक होस्ट देखील आहे, त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो सांगत आहे की 'जॉली एलएलबी ३'मध्ये त्याची सुमारे ३ सेकंदांची भूमिका होती, जी आता ओटीटी रिलीजच्या आधारावर चित्रपटात दिसत आहे, पण चित्रपटगृहांमध्ये हे दृश्य दाखवले गेले नव्हते. आयुष पुढे असेही म्हणतो, "मी ऐकले होते की अक्षय पाजी रोल कट करतात, आज बघितले देखील. मान्य आहे की मी सुंदर दिसतो पाजी, मग माझा रोल का कट केला? असो, हे सर्व सोडा, ओटीटीवर जा आणि 'जॉली एलएलबी ३' बघा, माझा ३ सेकंदांपेक्षा कमी असलेला रोल देखील चुकवू नका." आयुषच्या या दाव्यानंतर सिनेजगतात खळबळ उडाली आहे आणि सर्वत्र अक्षय कुमारची चर्चा होत आहे. मात्र, संपूर्ण व्हिडीओमध्ये आयुषने ही गोष्ट मस्करीच्या आणि गंमतीदार स्वरात मांडली आहे, त्याने सुपरस्टारवर कोणत्याही प्रकारचा थेट आरोप केलेला नाही.

'जॉली एलएलबी ३' ओटीटीवर रिलीज'जॉली एलएलबी ३' च्या ओटीटी रिलीजकडे पाहिले तर, हा कोर्ट रूम ड्रामा चित्रपट गेल्या १४ नोव्हेंबरला प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर ऑनलाइन प्रसारीत करण्यात आला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Akshay cut actor's role in 'Jolly LLB 3'? OTT reveals all.

Web Summary : Actor Aayush claims Akshay Kumar cut his role in 'Jolly LLB 3' during its theatrical release. The role is now visible on OTT.
टॅग्स :अक्षय कुमारअर्शद वारसी