Join us  

अक्षय कुमारनं 'या' कारणामुळे सोडलं होतं भारतीय नागरिकत्व

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 3:37 PM

नुकतेच एका मुलाखतीत खुद्द अक्षय कुमारने  भारतीय नागरिकत्व सोडून कॅनडाचे नागरिकत्व का स्वीकारले होते, याचा खुलासा केला. 

अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकांरापैकी एक आहे. पण, अक्षय कुमारला अनेकदा नागरिकत्वाच्या मुद्यावरून ट्रोलिंगचा सामना करावा लागला. भारताच्या स्वातंत्र्य दिनी अभिनेता अक्षय कुमारला भारताचे नागरिकत्व प्राप्त झाले.  भारताचे नागरिकत्व असण्यापूर्वी त्याच्याकडे कॅनडाचे नागरिकत्व होते. सोशल मीडियावर लोकांनी त्यांना कॅनेडियन कुमार असेही संबोधले होते. नुकतेच एका मुलाखतीत खुद्द अक्षय कुमारने  भारतीय नागरिकत्व सोडून कॅनडाचे नागरिकत्व का स्वीकारले होते, याचा खुलासा केला. 

अक्षय कुमार मुलाखतीत म्हणाला, "मी कॅनेडियन झालो. कारण एकेकाळी माझे चित्रपट सतत फ्लॉप होत होते. त्यावेळी माझा मित्र कॅनडात राहत होता आणि त्याने सांगितले की, तु इथे या, आपण एकत्र.  मी म्हणालो ठीक आहे, माझे चित्रपट देखील चांगले चालत नाहीत. जेव्हा मी टोरंटोमध्ये राहायला लागलो, तेव्हा मला कॅनडाचा पासपोर्ट मिळाला. त्याचकाळात माझे दोन चित्रपट रिलीज होणार होते. रिलीज झाल्यावर ते सुपरहिट ठरले. यानंतर पुन्हा भारतात परत आलो. तो फक्त एक प्रवासी दस्तऐवज होता. मी माझा कर भरतो आणि मी सर्वात मोठा करदाता आहे". 

अक्षय म्हणाला, ' १५ ऑगस्टला मला भारतीय नागरिकत्व मिळाल्याचे पत्र मिळाले, हा निव्वळ योगायोग होता. पण फक्त पासपोर्ट नाही तर तुमचं हृदय, तुमचा आत्मा भारतीय असायला हवा. जर माझ्याकडे भारतीय पासपोर्ट असेल पण माझा आत्मा, मन आणि हृदय भारतीय नसेल तर त्यला अर्थ काय?'

खिलाडी अक्षय कुमार सध्या 'मिशन राणीगंज' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'मिशन रानीगंज' मध्ये अक्षय कुमारने जसवंत सिंह गिलची भूमिका निभावली आहे. १९८९ साली कोळसा खाणीत अडकलेल्या कामगारांच्या सुटकेची ही कहाणी आहे.

 

अक्षय कुमारच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, 'मिशन रानीगंज' या चित्रपटाव्यतिरिक्त अक्षय कुमार , 'बडे मियाँ छोटे मियाँ', 'वेलकम 3', 'हेरा फेरी 3', 'हाऊसफुल 5', 'सूराराई पोत्रू' , 'स्काय फोर्स' यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अक्षय कुमारचा नुकताच 'OMG 2' चित्रपटात पाहायला मिळाला होता. 

टॅग्स :अक्षय कुमारबॉलिवूडसिनेमाभारत