Join us

अक्षय कुमारने गोल्डच्या टीमसोबत केली पार्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 16:43 IST

अक्षय कुमार नुकतेच त्याचा आगामी चित्रपट गोल्डचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटातून मौनी रॉय बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज ...

अक्षय कुमार नुकतेच त्याचा आगामी चित्रपट गोल्डचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटातून मौनी रॉय बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज झाली आहे. अक्षय कुमार गोल्ड चित्रपटाच्या टीमसोबत दिसला. नुकतेच मुंबईतल्या एका रेस्टोरेंट मध्ये गोल्डची रॅमअप पार्टी ठेवण्यात आली होती. ज्याठिकाणी गोल्डची संपूर्ण टीम मस्ती करताना दिसली. मौनी रॉयने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पार्टी दरम्यानचे फोटो शेअर केले आहे. ज्यात मौनीसोबत अक्षय कुमार, फरहान अख्तर, निर्माता रितेश सिधवानी, कुणाल कपूर, अमित साध, कोरियोग्राफर बोस्को मार्टिस आणि दिग्दर्शत रीमा कादगी दिसते आहे.   काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारने एका व्हिडिओच्या माध्यमातून चित्रपटाचे लास्ट शेड्यूल पूर्ण केल्याची माहिती दिली होती. अक्षयने इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला होता. हा चित्रपट रितेश सिधलानी आणि फरहान अख्तर यांच्या बॅनर खाली तयार होतो आहे. हा चित्रपट देश स्वतंत्र झाल्यानंतर मिळालेल्या पहिल्या ऑल्पिमिंक गोल्ड मेडलवर आधारित आहे. भारताना 1948 साली हॉकीमध्ये गोल्ड जिंकले होते. काही दिवसांपूर्वी चित्रपटाची शूटिंग लंडनमध्ये सुरू झाली आहे. चित्रपटाच्या सेटवरचे शूटिंग दरम्यानचे काही फोटो व्हायरल झाले होते. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2018 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात अक्षय कुमार बलबीर सिंग यांची भूमिका साकारतो आहे. भारताला हॉकीमध्ये गोल्ड मेडल मिळले तेव्हा भारतीय हॉकी संघाचे कर्णधर बलबीर सिंग होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑल्पिमिंकमध्ये तीन वेळा गोल्ड मेडल जिंकले आहे.  ALSO READ :  अक्षय कुमारच्या पॅडमॅन या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का? मौनी यानंतर रणबीर कपूरसोबत ब्रह्मस्त्रमध्ये दिसणार आहे. मौनी यात एक नेगेटिव्ह भूमिका साकारताना दिसणार आहे. तर अक्षय कुमारचा पॅडमॅन नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानंतर एप्रिलमध्ये रोबोट 2मध्ये सुद्धा दिसणार आहे. ऑगस्टमध्ये गोल्ड चित्रपट रिलीज होणार आहे. अक्षयने नुकताच 'मोगुल’ या चित्रपटात दिसणार काढता पाय घेतला आहे. अक्षय चित्रपटाचा दिग्दर्शक सुभाष कपूर यांना काही बदल सुचवले होते मात्र याकडे त्यांनी कानाडोळा केला. त्यामुळे अक्षयने यापासून दूर राहणं पसंत केले.