Join us  

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ प्रिमिअरआधीच ऑनलाईन लीक? घाईघाईत मेकर्सने घेतला हा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 12:03 PM

हा सिनेमा काल संध्याकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र...

ठळक मुद्देलक्ष्मी’हा तमिळ सिनेमा ‘कंचना’चा हिंदी रिमेक आहे. ओरिजीनल सिनेमात हिरोच्या भूमिकेचे नाव राघव होते.

अक्षय कुमार व कियारा अडवाणी स्टारर ‘लक्ष्मी’ या सिनेमाकडे चाहते डोळे लावून बसले होते. कोरोना महामारीमुळे चित्रपटगृह बंद झालीत आणि हा सिनेमा चित्रपटगृहांत रिलीज करण्याऐवजी ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय झाला. काल 9 नोव्हेंबर 2020 रोजी डिज्नी  प्लस हॉटस्टारवर सिनेमा रिलीज झाला. मात्र त्याआधीच म्हणजे प्रीमिअरपूर्वीच हा चित्रपट ऑनलाईन लीक झाला. मग काय, घाईघाईत मेकर्सने एक तासापूर्वीच म्हणजे संध्याकाळी 6 वाजता  सिनेमा रिलीज केला.

न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, अनेक टोरेंट वेबसाइटवर हा चित्रपट एचडी क्वालिटीमध्ये डाउनलोड करण्यात आला. राघव लॉरेन्सने दिग्दर्शित केलेला हा सिनेमा काल संध्याकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी ओटीटीवर   प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र, नंतर प्रीमिअरच्या 1 तासआधी म्हणजे 6 वाजताच प्रदर्शित करण्यात आला.

अक्षय कुमारचा हा सिनेमा रिलीजआधीच प्रचंड वादात सापडला होता. ट्रेलर रिलीज होताच हा सिनेमा लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप झाला होता. यानंतर या सिनेमाच्या टायटलवरही आक्षेप नोंदवण्यात आला होता. सोशल मीडियावर सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी झाली होती. या वादाच्या पार्श्वभूमीवर ऐनवेळी या सिनेमाचे ‘लक्ष्मी बॉम्ब’ हे नाव बदलून ‘लक्ष्मी’ असे नवे नामकरण करण्यात आले होते.

या चित्रपटात अक्षय कुमार व कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहे. अक्षयने आसिफ ही भूमिका साकारली आहे. तर कियाराने प्रिया ही व्यक्तीरेखा वठविली आहे. लक्ष्मी हा साऊथच्या ‘कंचना’ या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे.

 लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा  आरोपकाही दिवसांपूर्वीच ज्वेलरी ब्रॅन्ड तनिष्कच्या एका जाहिरातीवरून वादळ उठले होते. ही जाहिरात लव्ह जिहादला प्रोत्साहन देणार असल्याचा आरोप झाला होता. ‘लक्ष्मी’ या सिनेमावरही लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप झाला होता. अद्यापही लोक हाच आरोप करत आहेत. या सिनेमात अक्षय कुमारच्या भूमिकेचे नाव आसिफ  आहे. तर कियारा अडवाणीच्या भूमिकेचे नाव प्रिया आहे. ‘लक्ष्मी’हा तमिळ सिनेमा ‘कंचना’चा हिंदी रिमेक आहे. ओरिजीनल सिनेमात हिरोच्या भूमिकेचे नाव राघव होते. मग याच्या हिंदी रिमेकमध्ये हे नाव आसिफ कसे झालेआणि हिरोईनच्या भूमिकेचे नाव प्रिया का ठेवलेगेलेअसा सवाल अनेकांनी उपस्थित केला होता.

Laxmii Movie Review: 2020 मधील अक्षय कुमारचा सर्वात ‘बकवास’ सिनेमा

ट्रोलरने ट्विंकल खन्नाचा फोटो एडिट करत लिहिले ‘ट्विंकल बॉम्ब’, अभिनेत्रीने अशी केली बोलती बंद

 

टॅग्स :अक्षय कुमारलक्ष्मी बॉम्ब