Join us

अक्षय कुमारने केली 'केसरी ३'ची घोषणा? करण जोहरकडे पाहून म्हणाला, "पंजाबचं रुप सर्वांना..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 17:54 IST

'केसरी २'च्या ट्रेलर लाँचवेळी अक्षयचं मोठं विधान, 'केसरी ३' या दिग्गज व्यक्तिमत्वावर बनवणार

अक्षय कुमारच्या आगामी 'केसरी २' (Kesari 2) चा ट्रेलर आजच रिलीज झाला. जालियनवाला बाग हत्याकांडाचं सत्य यामध्ये उलगडणार आहे. अक्षय कुमार सिनेमा वकीलाच्या भूमिकेत आहे. तर आर माधवन इंग्रजांच्या बाजूचा वकील साकारत आहे. अक्षय आणि आर माधवन कोर्टात आमने सामने आल्याची झलक ट्रेलरमध्ये दिसून येते. हा सिनेमा अक्षयचा मास्टरपीस असल्याचं चाहते म्हणत आहेत. दरम्यान आज ट्रेलर लाँचवेळी अक्षयने 'केसरी ३'चीही (Kesari 3) घोषणा केली आहे.

'केसरी ३' येणार?

'केसरी २'चा ट्रेलर लाँच सोहळा पार पडल्यानंतर कलाकारांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अक्षय पंजाबीमध्ये म्हणाला, 'आता फक्त केसरी ३ ची तयारी करायची आहे.' मग तो करण जोहरकडे पाहून म्हणाला, 'मी तर म्हणतो आजच घोषणा करु. केसरी ३ सरदार हरि सिंह नालवा यांच्यावर बनवू. काय बोलतो?'  यानंतर सगळे टाळ्या वाजवतात. 'बस आता पंजाबचं रुप सर्वांना दाखवायचं आहे' असं तो शेवटी म्हणतो.

कोण होते सरदार हरि सिंह नालवा?

हरी सिंह नालवा महाराज रणजीत सिंह यांच्या फौजमधील सर्वात विश्वासू कमांडर होते. ते काश्मीर, हाजरा आणि पेशावरचे गव्हर्नर होते. अनेक अफगाण योद्ध्यांना त्यांनी धूळ चारली होती.  अफगाणच्या अनेक भागांमध्ये त्यांनी वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. इतिहासकार सांगतात की जर हरी सिंह नालवा यांनी पेशावर आणि उत्तर पश्चिम युद्धक्षेत्र जे आज पाकिस्तानचा भाग आहे ते युद्धात जिंकलं नसतं तर आज ते अफगाणिस्तानच्या ताब्यात असतं. आणि अशा प्रकारे अफगाणिस्तान कायमचं भारतासाठी डोकेदुखी असतं.

टॅग्स :अक्षय कुमारकेसरीकरण जोहरबॉलिवूड