Join us

फक्त तीन महिने बाकी! 'बडे मियां छोटे मियां' येणार प्रेक्षकांच्या भेटीला; वाचा कोणत्या तारखेला होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 16:13 IST

खिलाडी कुमारने सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. 

आगामी चित्रपट 'बडे मियां छोटे मियां' ची घोषणा झाल्यापासून याची चर्चा सर्वत्र आहे. तसेच, या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिका साकारणार आहेत आणि प्रेक्षक या चित्रपटासाठी चांगलेच उत्सुक आहेत. अशातच प्रेक्षकांच्या उत्सुकतेत भर घालत आता निर्मात्यांनी या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. खिलाडी कुमारने सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. 

 अक्षय आणि टायगर  या फोटोंमध्ये मिलिट्री प्रिंट पॅन्ट आणि मॅचिंग रंगाचा टी-शर्ट दिसत आहेत. पोस्ट शेअर करत अक्षयने तीन महिन्यांनी सिनेमा रिलीज होणार असल्याचं सांगितलं आहे. अर्थात यंदा ईदच्या मुहूर्तावर (10 एप्रिल 2024) 'बडे मियां छोटे मियां' हा सिनेमा रिलीज होणार आहे. त्याने लिहिलं, 'मोठ्या आणि छोट्याला भेटण्याची वेळ आली जवळ. फक्त तीन महिने बाकी. ईद 2024'. या पोस्टवर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तर काहींना हा सिनेमा हीट होणार असल्याचे भाकीत केले आहे.

वासु भगनानी, जॅकी भगनानी आणि पूजा एंटरटेनमेंटच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती होत आहे.  या सिनेमात जबरदस्त ॲक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत.  अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफसह सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर यांच्याही भूमिका असणार आहे. त्यामुळे चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.  

टॅग्स :अक्षय कुमारसेलिब्रिटीटायगर श्रॉफसिनेमा