Join us

‘१० ईअर चॅलेंज’ पूर्ण करत अक्षय कुमारने दिली ‘गुड न्यूज’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 15:28 IST

अक्षय कुमार व करिना कपूर यांच्या चाहत्यांसाठी एक ‘गुड न्यूज’ आहे. होय, ‘गुड न्यूज’चे शूटींग सुरु झालेय.

ठळक मुद्देअक्षय कुमार आणि करिना कपूर तब्बल नऊ वर्षांनंतर या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. यापूर्वी   2009मध्ये आलेल्या ‘कमबख्त इश्क’ या चित्रपटात दोघे एकत्र दिसले होते.    

अक्षय कुमारकरिना कपूर यांच्या चाहत्यांसाठी एक ‘गुड न्यूज’ आहे. होय, ‘गुड न्यूज’चे शूटींग सुरु झालेय.  अक्षयने टिष्ट्वटर अकाऊंटवर एक फोटो शेअर करत, याची माहिती दिली. विशेष म्हणजे, हा फोटो शेअर करताना अक्षयने ‘१० ईअर चॅलेंज’ही पूर्ण केले. ‘१० ईअर चॅलेंज’अंतर्गत करिनासोबतच्या दोन फोटोंचा कोलाज त्याने पोस्ट केला. यातला पहिला फोटो आहे ‘कमबख्त इश्क’ या चित्रपटाचा आणि दुसरा आहे ‘गुड न्यूज’च्या सेटवरचा.

 

‘‘गुड न्यूज’ ही आहे की, गेल्या दहा वर्षांत फार काही बदलेले नाही. आज आमच्या शूटींगचा पहिला दिवस...तुमच्या शुभेच्छा सोबत असू द्या..., असे अक्षयने हा कोलाज पोस्ट करताना लिहिले.  

निर्माता करण जोहरने अलीकडेच या चित्रपटाची घोषणा केली होती. आमची ‘गुड न्यूज’ ६ सप्टेंबरला रिलीज होईल, असे त्याने लिहिले होते. अक्षय व करिना यांच्याशिवाय कियारा अडवाणी, दिलजीत दोसांज यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. राज मेहता हा चित्रपट दिग्दशर््िात करतोय. दोन वेगवेगळ्या जनरेशन्सच्या कपलची कथा या चित्रपटात दाखवली जाणार आहे.अक्षय कुमार आणि करिना कपूर तब्बल नऊ वर्षांनंतर या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. यापूर्वी   2009मध्ये आलेल्या ‘कमबख्त इश्क’ या चित्रपटात दोघे एकत्र दिसले होते.   

टॅग्स :अक्षय कुमारकरिना कपूर10 ईअर चॅलेंज