Join us  

'गंगाजल' साठी अजय देवगण नाही तर 'हा' अभिनेता होता पहिली पसंत, सुपरहिट सिनेमाला मुकला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 9:02 AM

७ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या सिनेमाने ११ कोटींची कमाई केली होती.

2003 साली आलेल्या अजय देवगणच्या (Ajay Devgn) 'गंगाजल' (Gangajal) सिनेमाने तुफान यश मिळवले होते. आजही हा सिनेमा आवडीने पाहिला जातो. बॉलिवूडच्या सुपरहिट सिनेमांमध्ये गंगाजलची गणती होतेच. सत्य घटनेवर आधारित या सिनेमाला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला. ७ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या सिनेमाने ११ कोटींची कमाई केली होती. तर सिनेमाने वर्ल्डवाईड कलेक्शन १७ कोटी रुपये होते.

अजय देवगण, ग्रेसी सिंह आणि मुकेश तिवारी यांची मुख्य भूमिका असलेल्या गंगाजलने सिनेप्रेमींचं मन जिंकलं होतं. प्रकाश झा (Prakash Jha) यांनी फिल्मचं दिग्दर्शन आणि निर्मिती केली होती. याचं वैशिष्ट्य म्हणजे १९८० सालच्या सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा सर्वात कमी बजेट मध्ये बनला होता. १९८० साली बिहारच्या लपुर भागात पोलिसांनी ३१ आरोपींच्या डोळ्यात अॅसिड टाकले होते. या घटनेची खूप निंदा झाली होती. प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. कोर्टात बराच काळ केस चालली. आणि इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं की पोलिसांना दंड भरावा लागला.

या घटनेनंतर २३ वर्षांनी 'गंगाजल' सिनेमा आला आणि देशात हंगामा झाला. काही तथ्यांवर प्रश्न उपस्थित केले गेले. क्रिटिक्सने सिनेमाला चांगले रिव्ह्यू दिले.बॉक्सऑफिसवरही सिनेमाने चांगली कमाई केली. सिनेमाने अनेक अवॉर्ड्सही मिळवले. तेव्हा राष्ट्रीय मुद्द्यावर बनलेल्या या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. विशेष म्हणजे अजय देवगण सिनेमासाठी पहिली पसंत नव्हता तर अक्षय कुमार प्रकाश झा यांची पहिली पसंत होता. मात्र सिनेमाची स्क्रीप्ट वाचूनच अक्षय खूप नर्व्हस झाला होता. सिनेमात दाखवण्यात येणारी हिंसा त्याला पटली नाही आणि त्याने नकार दिला. सिनेमातून अजय देवगण आणि ग्रेसी सिंह ही फ्रेश जोडीही बॉलिवूडला मिळाली.

टॅग्स :अजय देवगणप्रकाश झाबॉलिवूडअक्षय कुमार