Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिषेक बच्चनसाठी ऐश्वर्याची खास पोस्ट, बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 10:44 IST

ऐश्वर्या रायने अभिषेकचा बालपणीचा फोटो पोस्ट केला.

बॉलिवूडचा 'ज्युनिअर बी' अर्थात अभिषेक बच्चन.  आपल्या आई-वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत गेली अनेक वर्षे अभिषेक इंडस्ट्रीत सक्रिय आहे.  अभिषेकचा जन्म ५ फेब्रुवारी १९७६ ला मुंबईत झाला होता. काल त्यानं ५० बर्थडे साजरा केला. अभिषेकने आयुष्यातील पन्नाशी गाठल्याने हे सेलिब्रेशन विशेष ठरले. अभिषेक बच्चनच्या ५० वा वाढदिवशी पत्नी ऐश्वर्या रायने त्याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली.

ऐश्वर्या रायने अभिषेकचा बालपणीचा फोटो पोस्ट केला. या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहलं, "५० व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा डिअर 'Baby Papa...' तुला खूप-खूप प्रेम, शांती, आनंद, समाधान आणि उत्तम आरोग्य लाभो. कायम असाच आनंदी राहा". ऐश्वर्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

२००७ मध्ये झाला होता विवाहऐश्वर्या आणि अभिषेक २००७ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. २०११ मध्ये त्यांच्या आयुष्यात आराध्याचे आगमन झाले. नुकतेच हे कुटुंब ख्रिसमस व्हेकेशनसाठी परदेशात गेले होते, ज्याचे फोटोही व्हायरल झाले होते.

अभिषेकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, २००० मध्ये 'रिफ्युजी' चित्रपटातून त्याने करिअरची सुरुवात केली होती. आता ५० व्या वर्षी तो एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. शाहरुख खानच्या बहुप्रतीक्षित 'किंग' या चित्रपटात अभिषेक एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. चाहते त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. दुसरीकडे, ऐश्वर्या दोन वर्षांपूर्वी मणिरत्नम यांच्या 'पोन्नियिन सेल्वन २' मध्ये शेवटची दिसली होती. तिला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Aishwarya's heartfelt post for Abhishek: Shares childhood photo, expresses love.

Web Summary : Aishwarya Rai Bachchan wished Abhishek a happy 50th birthday with a childhood photo and loving message. They married in 2007 and have a daughter, Aaradhya. Abhishek will appear in Shah Rukh Khan's 'King', while Aishwarya last starred in 'Ponniyin Selvan 2'.
टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनअभिषेक बच्चन