Join us

अभिषेक बच्चन नव्हे तर हा अभिनेता आहे जगातील सगळ्यात सेक्सी पुरुष, ऐश्वर्या रायनेच दिली होती कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 16:20 IST

जगातील सगळ्यात सेक्सी पुरुष कोण आहे, यावर ऐश्वर्याने कोणाचे नाव घेतले होते हे ऐकून तुम्हाला सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसेल.

ठळक मुद्देऐश्वर्याने सलमानचे नाव घेत तो जगातील सगळ्यात सेक्सी पुरुष असल्याचे कबूल केले होते.

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या अफेअरची एकेकाळी चांगलीच चर्चा रंगली होती. ते दोघे अनेक सार्वजनिक ठिकाणी एकत्र हजेरी लावत असत. ते दोघे लग्न करणार असे वाटत असतानाच त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्या दोघांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.

सलमान आणि ऐश्वर्याच्या फॅन्सना देखील त्यांची जोडी प्रचंड आवडत असे. ते दोघे अनेक समारंभात देखील एकत्र हजेरी लावत असत. तसेच मीडियात देखील ते दोघे एकमेकांविषयी बोलताना दिसायचे. ऐश्वर्याने काही वर्षांपूर्वी सिमी गरेवाल यांच्या Rendezvous with Simi Garewal या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तिने तिच्या खाजगी आयुष्यातील अनेक सिक्रेट शेअर केले होते. या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या कार्यक्रमात ऐश्वर्याला विचारण्यात आले होते की, तुझ्यामते जगातील सगळ्यात सेक्सी पुरुष कोण आहे. यावर ऐश्वर्याने कोणाचे नाव घेतले होते. हे ऐकून तुम्हाला सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसेल. त्यावेळी ऐश्वर्याने सलमानचे नाव घेत तो जगातील सगळ्यात सेक्सी पुरुष असल्याचे कबूल केले होते.

हम दिल दे चुके या चित्रपटातील सलमान आणि ऐश्वर्याची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडली होती. या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाले असले समीर-नंदिनी ही पात्रं आजही प्रेक्षकांच्या मनात ताजी आहेत. सलमान आणि ऐश्वर्या या दोघांची हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील केमिस्ट्री खूप चांगली जुळून येण्यामागे एक खास कारण होते. कारण या चित्रपटाच्या वेळी त्या दोघांचे अफेअर सुरू असल्याच्या चर्चा मीडियात रंगल्या होत्या. त्यामुळे त्यांची रिअल लाइफमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना रिल लाइफमध्ये देखील पाहायला मिळाली होती. सलमान खान आणि ऐश्वर्या रायच्या जोडीचा त्यावेळी बोलबाला असल्याने त्या दोघांना अनेक चित्रपटात नायक-नायिकेच्या भूमिकेसाठी विचारले जात असे. त्यांनी त्यानंतर देखील काही चित्रपटांमध्ये काम केले होते. पण त्यांच्या ब्रेकअपनंतर प्रेक्षकांना त्यांना कधीच एकत्र पाहायला मिळाले नाही.

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनअभिषेक बच्चनसलमान खान