जागतिक सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ७९ व्या कान्स चित्रपट महोत्सवाची (Cannes Film Festival) सध्या जगभरात चर्चा आहे. मात्र, यंदा या महोत्सवात एका गोष्टीची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे, ती म्हणजे 'कान्स क्वीन' ऐश्वर्या राय बच्चन. दोन दशकांपासून कान्सची शोभा वाढवणारी ऐश्वर्या अद्याप रेड कार्पेटवर दिसलेली नाहीच, पण ब्रँडच्या अधिकृत पोस्टरवरूनही ती गायब असल्याने सोशल मीडियावर चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.
'लॉरिअल पॅरिस'ची (L’Oréal Paris) दीर्घकाळची जागतिक ब्रँड ॲम्बेसेडर असलेल्या ऐश्वर्याचे फोटो दरवर्षी कान्सच्या ले मार्टिनेझ हॉटेलबाहेर मोठ्या दिमाखात लावले जातात. मात्र, यंदा या पोस्टर्समध्ये आलिया भट, व्हायोला डेव्हिस, इवा लोंगोरिया, हेलन मिरन आणि जेन फोंडा यांसारख्या अभिनेत्रींना स्थान मिळाले, पण ऐश्वर्याचा फोटो कुठेही दिसला नाही. आलियाला पाहून काही चाहते खूश झाले असले तरी, ऐश्वर्याच्या अनुपस्थितीमुळे जगभरातील तिचे चाहते नाराज झाले आहेत.
ऐश्वर्याच्या अनुपस्थितीमुळे सोशल मीडियावर प्रश्नांचा भडिमार सुरू झाला. एका युझरने विचारलं, "ऐश्वर्या कुठे आहे?" तर दुसऱ्याने लिहिलं, "मी हा ब्रँड फक्त ऐश्वर्यामुळेच ओळखतो, तिचा चेहरा कुठे आहे?" अनेक चाहत्यांनी संताप व्यक्त करत म्हटले की, "वर्षानुवर्षे ज्या अभिनेत्रीने ब्रँडला जागतिक ओळख दिली, तिलाच अशा प्रकारे डावलणे चुकीचे आहे".
ब्रँडने अखेर मौन सोडलं!
वाढता वाद आणि चाहत्यांची नाराजी पाहून 'लॉरिअल'ने एका कमेंटला उत्तर दिलं. एका चाहत्याने "ऐश्वर्या राय-बच्चन कुठे आहे? आम्हाला ऐश्वर्या राय बच्चन फक्त 'कान्स' फेस्टिवलमध्ये दिसते. ऐश्वर्याचा ऑरो अतुलनीय आहे. त्यामुळे तिला प्रमोट करा आणि तिचा सन्मान करा" असे लिहिल्यावर ब्रँडने उत्तर दिले की, "वर्षानुवर्षं एकामागून एक कान्स महोत्सव झाले आणि ती कधीच गैरहजर राहिली नाही". यामुळे ऐश्वर्या लवकरच रेड कार्पेटवर दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, "मग तिचे पोस्टर का नाही?" हा प्रश्न अद्याप चाहत्यांच्या मनात कायम आहे.
'देवदास' चित्रपटाच्या प्रीमियरपासून ऐश्वर्या राय बच्चन कान्सचा अविभाज्य भाग आहे. तेव्हापासून ती भारताचा जागतिक चेहरा बनली आहे. तिच्या अप्रतिम फॅशन स्टेटमेंटमुळे तिला 'जागतिक फॅशन आयकॉन' मानले जाते. आता यंदाच्या महोत्सवात ती कधी एन्ट्री घेते आणि आपल्या लूकने पुन्हा एकदा जगाला भुरळ घालते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Aishwarya Rai Bachchan's absence from Cannes posters sparks outrage. L'Oréal clarifies she will attend, reassuring fans. Her continued presence anticipated.
Web Summary : कान्स के पोस्टरों से ऐश्वर्या राय बच्चन के गायब होने पर प्रशंसकों में आक्रोश। लॉरियल ने स्पष्ट किया कि वह शामिल होंगी, जिससे प्रशंसकों को तसल्ली मिली। उनकी उपस्थिति अपेक्षित है।