Join us

अरे ही तर कार्बन कॉपी! ऐश्वर्यासारखी दिसणारी 'ती' नक्की आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 14:02 IST

ऐश्वर्याची नक्कल करत तिने सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळेच टिकटॉकवर तिचे फक्त ७ दिवसांत १६००हून अधिक फॉलोअर्स वाढले आहेत. 

कोरोनाव्हायरसने लोकांची जीवनशैली पूर्णपणे बदलून टाकली आहे, घरात बंदिस्त असल्यामुळे स्वतःच्या करमणूकीसाठी सारेच त्यांचे फनी व्हिडीओ बनवण्यात मग्न दिसले.सेलिब्रेटींपासून ते सर्वसामान्यापर्यंत प्रत्येकजण हा सोशल मीडियावरच रमताना दिसला. अशात अनेक व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत यात एका व्हिडीओने नेटीझन्सचे लक्ष वेधून घेतले.

@aashitasinghrathore

♬ Apun Bola (From "Josh") - Shahrukh Khan & Hema Sardesai

काही दिवसांपासून ऐश्वर्या राय बच्चनसारखी हुबेहूब दिसणारी एक तरुणी सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. सेम टू सेम ऐश्वर्या सारख्या दिसणाऱ्या या मुलीचे व्हिडीओ सध्या इंटरनेट धुमाकूळ घालत आहेत.

@aashitasinghrathore

♬ original sound - fathima.7093

आतापर्यंत टिकटॉकमुळे अनुष्का शर्मा, अजय देवगन, शाहरुख खान, सलमान खान, सुनील शेट्टी, श्रीदेवी आणि करिना कपूर याच्यासारखे हुबेहूब दिसणारे टिकटॉक स्टार सापडले आहेत. यात आता ऐश्वर्या रायचीही एंट्री झाली आहे.

@aashitasinghrathore

♬ Meri Sansaon Main Basa Hai - Alka Yagnik

या मुलीचं नाव आशिता सिंह राठौर असून ती टिकटॉकवर ऐश्वर्याच्याच सिनेमाच्या डायलॉगचे व्हिडीओ शेअर करताना दिसते. ऐश्वर्याची नक्कल करत तिने सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळेच टिकटॉकवर तिचे फक्त ७ दिवसांत १६००हून अधिक फॉलोअर्स वाढले आहेत. 

@aashitasinghrathore

♬ original sound - shivanijha

टिकटॉकवर आशिताचे व्हिडीओ पाहून सर्वच हैराण झाले आहेत. कारण आशिता आणि ऐश्वर्याच्या चेहऱ्यात खूपच साम्य आहे. जेव्हा तुम्ही लक्षपूर्वक पाहता तेव्हा तुमच्या लक्षात येत की, ती ऐश्वर्या नाही तर तिच्यासारखी दिसणारी कोणीतरी दुसरी मुलगी आहे. 

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चन