छोट्या पडद्यावर रंगणार का ऐश्वर्या- सलमानचा ‘मुकाबला’?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2016 17:19 IST
ऐश्वर्या राय बच्चन आणि सलमान खान या दोघांचे पूर्वायुष्य कुणापासूनही लपून राहिलेले नाही. सलमान सध्या ‘बिग बॉस’मुळे चर्चेत आहेत. ...
छोट्या पडद्यावर रंगणार का ऐश्वर्या- सलमानचा ‘मुकाबला’?
ऐश्वर्या राय बच्चन आणि सलमान खान या दोघांचे पूर्वायुष्य कुणापासूनही लपून राहिलेले नाही. सलमान सध्या ‘बिग बॉस’मुळे चर्चेत आहेत. मोठ्या पडद्याप्रमाणेच छोट्या पडद्यावरदेखील सलमान ‘दबंग’ ठरला आहे. पण आता सलमानच्या छोट्या पडद्यावरील ‘दबंगगिरी’ आव्हान देण्यासाठी ऐश्वर्या राय बच्चन सज्ज झाली आहे. होय, एका सिंगीग रिअॅलिटी शोमधून ऐश्वर्या छोट्या पडद्यावर डेब्यू करणार असल्याची चर्चा आहे. ‘दिल है हिंदुस्तानी’ हा रिअॅलिटी शो जज करण्याची आॅफर ऐश्वर्याला मिळाली आहे. अर्थात या बातमीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या शोमध्ये आधीच चार जजची नावे फायनल झाली आहेत.करण जोहर, शेखर रवजियानी, बादशाह आणि शाल्मली खोलगडे असे चार जण जजच्या खुर्चीवर बसलेले दिसणार आहे आणि चर्चा सकारात्मक झालीच तर ऐश या शोची पाचवी जज असणार आहे. या शोची आॅफर ऐशला मिळाली आहे. तूर्तात तरी ऐशने या शोला होकार दिलेला नाही. पण संबंधित चॅनलने ऐशला तयार करण्याची जबाबदारी करण जोहरवर सोपवली आहे. त्यामुळे ऐशने ही आॅफर स्वीकारावी, यासाठी तिचे मन वळवण्याचे प्रयत्न करणकडून सुरु आहेत. कदाचित करणचा शब्द ऐश्वर्या खाली जाऊ देणार नाही. त्यामुळेच ऐश्वर्या या शोमध्ये दिसण्याच्या शक्यता कित्येकपटींनी वाढली आहे. ऐश्वर्यामुळे शो कमी वेळात लोकप्रीय होईल, अशी संबंधित चॅनलची अपेक्षा आहे आणि असे झालेच तर ऐश्वर्या तिचा थेट मुकाबला सलमानशी असेल. कारण सलमान सध्या टीव्हीवरचा सगळ्यात लोकप्रीय होस्ट आणि सेलिब्रिटी आहे. यापूर्वी अमिताभ बच्चन, शाहरूख खान आदी दिग्गज टीव्ही शो होस्ट करताना दिसले. पण सध्याचे म्हणाल तर सध्या सल्लू मियाँचाच बोलबाला आहे. त्यामुळे ऐश्वर्या विरूद्ध सलमान हा मुकाबला अटळ आहे. आता हा मुकाबला रंगलाच तर कसा रंगतो, हे पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे.