अभिनेता लक्ष्य आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये मुख्य भूमिकेत दिसला होता. 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' वेबसीरिजला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आणि सर्वत्र सीरिजची चर्चा आहे. त्यामुळे लक्ष्यची सर्वत्र चर्चा होत आहे. 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' पूर्वी लक्ष्य 'किल' या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रॉडक्शनने केली होती. 'किल'ला समीक्षकांकडून खूप प्रशंसा मिळाली होती. आता 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यच्या हातात धर्मा प्रॉडक्शनचे अनेक चित्रपट आहेत.
'किल' आणि 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'नंतर लक्ष्य सध्या 'चाँद मेरा दिल' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटात तो अनन्या पांडेसोबत दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रॉडक्शनने केली असून विवेक सोनी याचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटात दोघांची प्रेमकथा पाहायला मिळेल.
झळकणार 'दोस्ताना २' सिनेमात
यानंतर तो 'दोस्ताना २' सुरू करेल. 'दोस्ताना २' हा लक्ष्यचा बॉलिवूड डेब्यू चित्रपट होणार होता. मात्र, हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला आणि आता तो पुन्हा चित्रपटाचे काम सुरू करेल. यापूर्वी या चित्रपटात लक्ष्यसोबत कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर देखील दिसणार होते. मात्र, आता लक्ष्यव्यतिरिक्त या चित्रपटात विक्रांत मेस्सी दिसणार आहे. तर श्रीलीला किंवा प्रतिभा रांटा यापैकी कोणीतरी मुख्य भूमिकेत दिसेल.
लक्ष्यच्या हातात धर्माचा चौथा चित्रपटआता अशी माहिती मिळतेय की जान्हवी कपूर आणि लक्ष्य आणखी एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. 'किल', 'चाँद मेरा दिल' आणि 'दोस्ताना २' नंतरचा हा लक्ष्यचा धर्मा प्रॉडक्शनचा चौथा चित्रपट असेल. हिंदुस्तान टाईम्सनुसार, लक्ष्यने हा चित्रपट साईन केला आहे. या चित्रपटात तो जान्हवी कपूरच्या अपोझिट दिसणार आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफही दिसणार आहे. 'गुड न्यूज' बनवणारे राज मेहता या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळेल. डिसेंबर २०२५ मध्ये चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल. या प्रोजेक्टची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
Web Summary : Lakshya, post 'Bad Boys' success, bags multiple Dharma Productions films. He's filming 'Chaand Mera Dil' with Ananya Panday and will star in 'Dostana 2' with Vikrant Massey. He also signed a fourth Dharma film with Janhvi Kapoor and Tiger Shroff, directed by Raj Mehta.
Web Summary : 'बैड बॉयज़' की सफलता के बाद, लक्ष्य ने धर्मा प्रोडक्शंस की कई फिल्में हासिल कीं। वह अनन्या पांडे के साथ 'चांद मेरा दिल' की शूटिंग कर रहे हैं और विक्रांत मैसी के साथ 'दोस्ताना 2' में अभिनय करेंगे। उन्होंने जान्हवी कपूर और टाइगर श्रॉफ के साथ राज मेहता द्वारा निर्देशित एक चौथी धर्मा फिल्म भी साइन की।