Join us

‘पुष्पा’नंतर रश्मिकानं वाढवली फी, ‘पुष्पा- द रूल’साठी इतक्या कोटींची डिमांड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 15:31 IST

Pushpa actress Rashmika Mandanna hike her fees : ‘पुष्पा- द राइज’या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. रश्मिका मंदानाचा अभिनय पाहून फॅन्स क्रेझी झालेत. आता सिनेमा सुपरडुपर हिट झाल्यावर आणि सगळीकडून इतकं कौतुक झाल्यावर भाव वाढणारच ना?

अल्लू अर्जुन आणि ‘नॅशनल क्रश’ रश्मिका मंदानाचा ‘पुष्पा- द राइज’ (Pushpa) हा सिनेमा सुपरडुपर हिट झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. अल्लू अर्जुनच्या अदाकारीनं प्रेक्षकांची मनं जिंकलीच. पण रश्मिका मंदानाचा (Rashmika Mandanna) अभिनय पाहूनही फॅन्स क्रेझी झालेत. आता सिनेमा सुपरडुपर हिट झाल्यावर आणि सगळीकडून इतकं कौतुक झाल्यावर भाव वाढणारच ना? होय, ‘पुष्पा- द राइज’ नंतर रश्मिकाने तिच्या फीमध्ये मोठी वाढ केल्याचं कळतंय.

‘पुष्पा- द राइज’ हा पहिला पार्ट आहे. या सिनेमाचा दुसरा पार्ट  ‘पुष्पा- द रूल’ लवकरच येणार आहे. पुष्पाच्या पहिल्या पार्टसाठी रश्मिकाने म्हणे 2 कोटी रूपये घेतले होते. आता दुसऱ्या पार्टसाठी तिने थेट 3 कोटींची डिमांड केल्याचं कळतंय. निर्मात्यांनी रश्मिकाची ही डिमांड पूर्ण केलीच तर, हे तिच्या करिअरमधील आत्तापर्यंतचं सर्वाधिक मानधन असेल.

रश्मिका साऊथमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने ‘किरिक पार्टी’ या कन्नड चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर तिचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले. रिपोर्टनुसार, रश्मिका 30 कोटी रूपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. बेंगळुरूमध्ये तिचा 8 कोटींचा व्हिला आहे.  अलिशान गाड्या आहेत.  रश्मिकाने अलिकडेच गोव्यातही घर खरेदी केली आहे. या घराचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. 2020  मध्येही रश्मिकाने हैदराबादमध्ये घेतलं आहे. रश्मिका लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ती पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गुडबाय’ चित्रटातही ती झळकणार आहे.

टॅग्स :रश्मिका मंदानाTollywood