धोनीच्या यशानंतर सुशांतने वाढविली पाचपट फी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2016 17:17 IST
दिग्दर्शक नीरज पांडे दिग्दर्शित ‘एम.एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात क्रिकेटर महेंद्र सिंग धोनी याची भूमिका सुशांत सिंग ...
धोनीच्या यशानंतर सुशांतने वाढविली पाचपट फी
दिग्दर्शक नीरज पांडे दिग्दर्शित ‘एम.एस. धोनी द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात क्रिकेटर महेंद्र सिंग धोनी याची भूमिका सुशांत सिंग राजपूतने साकारली होती. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर सर्वाधिक कमाई करणारा बायोपिक ठरला होता. या चित्रपटानंतर सुशांतने आपली फी वाढविली आहे. आगामी ‘राबता’ या चित्रपटासाठी त्याने १० कोटी आकारले आहे. टीव्ही मालिकेनंतर सुशांतने बॉलिवूडमध्ये ‘काय पो छे’ या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली होती. ‘पीके’ व शुद्ध देसी रोमांस या चित्रपटात त्याने भूमिका साकारल्या. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी याचा बायोपिक ‘एम.एस. धोनी अनटोल्ड स्टोरी’ हा त्याचा सर्वांत यशस्वी चित्रपट ठरला होता. बॉक्स आॅफिसवर या चित्रपटाने १०० कोटीची कमाई केली आहे. धोनी या चित्रपटासाठी सुशांतने २ कोटी रुपये आकारले होते. तर आगामी ‘राबता’ या चित्रपटासाठी त्याने तब्बल १० कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्याने आपल्या फीमध्ये तब्बल पाच पट वाढ केली आहे. आगामी ‘राबता’ या चित्रपटात तो अभिनेत्री क्रिती सेनन सोबत दिसणार आहे. सुशांत व क्रितीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘राबता’चा फर्स्ट लूक जाहीर करण्यात आला. टी सिरीज प्रोेडक्शनच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन दिनेश विजान करीत आहेत. ‘राबता’ ९ जून २०१७ ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग मॉरिशस येथे करण्यात आले आहे. ‘राबता’च्या फर्स्ट लूक मध्ये सुशांत एका वूडन चेअरवर बसला असून त्याच्या मांडीवर क्रिती बसलेली दिसते. ‘राबता’च्या शूटिंग दरम्यान दोघांत काहीतरी शिजत असल्याचे सांगण्यात आले होते. }}}}