Join us
Daily Top 2Weekly Top 5

'जुगनू' गाणं सुपरहिट झाल्यानंतर आता बादशाह घेऊन आला नवीन गाणं, दिसला ५ वेगवेगळ्या अवतारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 19:11 IST

बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर बादशाहचे 'जुगनू' गाणं खूप हिट ठरले. त्यानंतर आता तो नवीन गाणं प्रेक्षकांसाठी घेऊन आला आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर बादशाहचे 'जुगनू' गाणं खूप हिट ठरले. त्यानंतर आता तो नवीन गाणं प्रेक्षकांसाठी घेऊन आला आहे. प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय फ्रँचायझी से येस टू द ड्रेसची भारतीय आवृत्ती भारतात डिस्कव्हरी+ ने आणली आहे. विवाहाच्या काळामध्ये या ब्रँडने भारतातील सर्वांत प्रसिद्ध रॅपर्स आणि युवा सेन्सेशन बादशाहला या म्युझिक व्हिडिओसाठी घेतले आहे. आघाडीची महिला गायिका म्हणून त्याच्यासोबत मेलोडीयस आवाजाची पायल देव आहे. या श्रवणीय ट्रॅकला आदित्य देवने कंपोझ केले आहे व व्हिडिओची निर्मिती द कंटेंट टीम ह्या प्रॉडक्शन हाऊसने केली आहे. या गाण्याच्या व्हायरलिटी क्षमतेला आणखी उंचावण्यासाठी डिस्कव्हरी+ ने प्रत्येकाचा आवडता डान्सर व अतिशय प्रसिद्ध अशा पुनित जे पाठकला कोरिओग्राफसाठी सहभागी केले आहे.

तसेच पहिल्यांदाच श्रोत्यांना प्रसिद्ध कंपोझर बादशाहला याआधी कधीही न बघितलेल्या पाच अवतारांमध्ये पाहायला मिळणार आहे. इव्हेंट मॅनेजर, पंडीत, शेफ, रॅपर आणि फॅशन डिझायनर बनून तो अतिशय ऊर्जेने परफॉर्म करताना बादशाह दिसणार आहे. 

से येस टू द ड्रेस इंडिया या नवीन ट्रॅकबद्दल बोलताना बादशहा म्हणाला, हे गीत वधूच्या मनात येणाऱ्या अनेक विचारांना कॅप्चर करण्याचा मी प्रयत्न करत असताना त्याचे प्लेआउट आखणे अतिशय मजेशीर होते. पहिल्यांदाच मी केवळ माझ्या भूमिकेत नव्हतो तर काही अतिशय वेगळ्या 'अवातारांमध्येही' होतो व त्यामुळे हा अनुभव माझ्यासाठीसुद्धा अतिशय वेगळा ठरला. 

टॅग्स :बादशहा