शाहरुखनंतर शबानालाही अडविले विमानतळावर !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2016 14:10 IST
हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आजमीसोबत अमेरिकेतील शिकागो विमानतळावर असे काही घडले जे चकित करणारे आहे. शाहरूख खान ...
शाहरुखनंतर शबानालाही अडविले विमानतळावर !
हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आजमीसोबत अमेरिकेतील शिकागो विमानतळावर असे काही घडले जे चकित करणारे आहे. शाहरूख खान सारखेच शबानालाही अमेरिकन अधिकाऱ्यानी अडविले आणि चौकशी केली. एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी शबाना शिकागोला पोहचल्यानंतर विमानतळावर इमिग्रेशन अधिकाऱ्यानी शबाना आजमीला येण्याचे कारण विचारले, तर ‘मी इथे शूटिंगसाठी आली आहे’ असे तिने उत्तर दिले. हे ऐकताच इमिग्रेशन अधिकारी चकित झाला आणि उंच आवाजात पुन्हा विचारले की, कुणाला शूट (बंदूकीची गोळी मारणे) करण्यासाठी इथे आली आहेस?’ यानंतर शबानाने सावरत सांगितले की, ‘मी इथे चित्रपटाच्या शूटिंगसाठी आली आहे.’ तिचे हे उत्तर ऐकल्यानंतर अधिकारी पुन्हा तिच्यावर चिडला आणि ‘तु शूटिंग का म्हणाली?’ यावर शबानाने सांगितले की, ‘मी कलाकार आहे आणि आम्ही याला असेच म्हणतो.’ शबाना आजमी ज्या चित्रपटासाठी शूटिंगसाठी शिकागो गेली आहे, तो चित्रपट होमोसेक्सुअलिटीवर आधारित आहे. चित्रपटात शबानाने एक होमोसेक्सुअल मुलीच्या आईची भूमिका साकारत आहे. तिच्या मते या चित्रपटात तिची भूमिका विशेष आहे.