Join us
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला कोरोना झाल्याने सोहेल खानची पाली हिलमधील बिल्डींग महापालिकेकडून सील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 16:11 IST

करीना आणि अमृता अरोरा शिवाय महीप कपूर आणि सीमा खानलाही कोरोनाची लागण झाली आहे. चौघेही एकमेकांच्या संपर्कात आल्या होत्या.

अभिनेता सोहेल खान याची पत्नी सीमा खान (Seema Khan), तिची बहीण आणि मुलगा कोविड बाधित (Covid-19) असल्याने ते राहत असलेले पाली हिल येथील किरण टॉवर्स इमारत सील करण्यात आली आहे. तसेच या इमारतीमध्ये घरकाम व अन्य कामांसाठी येणारे कर्मचारी व रहिवाशांची आर टी पी सी आर चाचणी करण्यासाठी मंगळवारी पालिकेमार्फत कॅम्प लावण्यात आला होता.

करीना आणि अमृता अरोरा शिवाय महीप कपूरलाही कोरोनाची लागण झाली आहे. चौघेही एकमेकांच्या संपर्कात आले होते. हे चौघेही एकाच गर्ल गँगमध्ये आहेत आणि सोबतच पार्टी अथवा गेट टुगेदर करतात. बॉलीवूड सेलिब्रिटींमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर बीएमसी याबाबत खूप सावध झाली आहे. दोन्ही अभिनेत्रींच्या इमारतीत आरटी पीसीआर चाचणी करणार आहे.

करण जोहरच्या पार्टीतून पसरला कोरोना - माध्यमांतील वृत्तांनुसार, सर्वात पहिले सीमा खानला कोरोनाची लागण झाली. ती गेल्या 8 डिसेंबरला करण जोहरच्या घरी गट टुगेदरसाठी गेली होती. या पार्टीत करीना कपूर खान, अमृता अरोराही उपस्थित होत्या. 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. 11 डिसेंबर रोजी सीमा खानचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर करीना खान आणि अमृता अरोरा यांचीही कोरोना चाचणी झाली. यात त्या दोघीही संक्रमित आढळल्या.

टॅग्स :करिना कपूरकरण जोहर