Join us
Daily Top 2Weekly Top 5

सारानंतर आता कार्तिक या अभिनेत्रीसोबत दिसला फ्लर्ट करताना, पहा हा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 11:28 IST

कार्तिक आर्यन व सारा अली खान यांचे ब्रेकअप झाल्याचं बोललं जात आहे.

अभिनेत्री सारा अली खान गेल्या काही दिवसांपासून तिच्या चित्रपटांपेक्षा पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत असते. कार्तिक आर्यनसोबतच्या तिच्या अफेअरच्या चर्चा सध्या बी-टाऊनमध्ये जोरात आहेत. गेल्या काही महिन्यांत सारा व कार्तिक अनेकदा एकत्र स्पॉट झालेत. मात्र आता काही दिवसांपूर्वी या दोघांचे ब्रेकअप झाल्याचं बोललं जात आहे. याआधी सगळीकडे दिसणारे कार्तिक व सारा हल्ली एकत्र दिसत नाहीत.

गेल्या काही दिवसांपासून कार्तिक आणि अनन्या पांडे यांच्यात जवळीक वाढल्याचं दिसत आहे.

पण आता कार्तिकचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात तो करीना कपूरसोबत फ्लर्ट करताना दिसतो आहे.

कार्तिक आर्यननं नुकतेच करीना कपूरचा रेडिओ शो ‘व्हॉट वुमेन वॉन्ट’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी तो रिलेशनशिप या विषयावर बोलला. दरम्यान या शोमध्ये करिना कपूरनं कार्तिकला काही प्रश्न विचारले त्यातील एक प्रश्न असा होता. कपल गोल्ससाठी कोणती जोडी तुझ्या मते बेस्ट आहे. त्यावर कार्तिक सैफ-करिनाचं नाव घेतो मात्र करिना त्याला असं न करण्याविषयी सांगते. त्यानंतर कार्तिक काही विचार करतो आणि तिला विचारतो, पण तु लग्न का केलं, यावर करिना लाजली आणि मग म्हणाली की, कार्तिक खूप नॉटी आहे.

करीना कपूरच्या शोच्या या सीझनमध्ये कार्तिक आर्यन तिचा दुसरा गेस्ट आहे.

या आधी करिनाच्या सासूबाई शर्मिला टागोर यांनी तिच्या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी तिला बरेच सल्ले दिले होते आणि प्रेक्षकांशी आपले वेगवेगळे अनुभवही शेअर केले.

टॅग्स :सारा अली खानकार्तिक आर्यनकरिना कपूर