Join us
Daily Top 2Weekly Top 5

'डर'नंतर असे काय घडलं की?, सनीने शाहरुखशी ठेवला होता तब्बल 16 वर्षे अबोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 17:11 IST

बॉलिवूडमधले कॅट फाईटचे किस्से काही नवीन नाहीत. मात्र आम्ही आता तुम्हाला जरा वेगळी बातमी सांगणार आहोत.

ठळक मुद्देएका चॉट शो दरम्यान सनीने हा पुन्हा एकदा खुलासा केला.   

बॉलिवूडमधले कॅट फाईटचे किस्से काही नवीन नाहीत. मात्र आम्ही आता तुम्हाला जरा वेगळी बातमी सांगणार आहोत. तुम्हाला माहिती आहे का 'डर' सिनेमानंतर बऱ्याच काळ शाहरुख खानशीसनी देओल बोलला नव्हता. होय, हे खरं आहे 'डर'नंतर सनी देओल 16 वर्षे शाहरुख खानशी बोलत नव्हता. ऐवढंच नाही तर त्यानंतर सनीने कधीच यशराजच्या सिनेमातदेखील काम केले नाही. एका चॅट शो दरम्यान सनीने हा पुन्हा एकदा खुलासा केला आहे.   

नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, सनीला जेव्हा विचारण्यात आले की, सिनेमाच्या शूटिंग दरम्यान त्याच्याबाबत इतरांच्या मनात भिती निर्माण झाली होती का ?, यावर तो म्हणाला, त्यांच्याच मनात काहीतरी कटूता राहिली असेल. ज्यामुळे त्यांच्या मनात भिती होती. त्यानंतर सनीला तू 'डर'नंतर 16 वर्षे शाहरुखशी बोलला नाहीस का असा प्रश्न विचारण्यात आला, त्यावर त्यांने होकारार्थी उत्तर दिले.  

या भांडणामागचे कारण सांगताना सनी म्हणाला, शेवटी सिनेमात लोकांनी मला पसंत केले. शाहरुखला सुद्धा केलं. सिनेमाला घेऊन मला फक्त ऐवढीच अडचण होती की मला माहिती नव्हते यात व्हिलनची भूमिकासुद्धा इतकी महत्त्वाची आहे. मी सिनेमात नेहमी स्वच्छंद मनाने आणि लोकांवर विश्वास ठेवून काम करतो. मात्र सगळेच कलाकार तसं करत नाहीत.  कदाचित त्यांना स्टारडम हवी असते.   

रिपोर्टनुसार सनीने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, तो यश चोप्रा यांच्यासोबत काम करणार नाही कधी. सनीचे म्हणणे होते की, यश चोप्राने त्याला धोका दिला होता. 

टॅग्स :सनी देओलशाहरुख खान