Join us
Daily Top 2Weekly Top 5

कियारा आडवाणीनंतर आता बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं केलं टॉपलेस फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 11:07 IST

मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये अभिनेत्री कियारा आडवाणीने टॉपलेस फोटोशूट केले होते, ज्याची सगळीकडे खूप चर्चा झाली होती.

मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये अभिनेत्री कियारा आडवाणीने टॉपलेस फोटोशूट केले होते, ज्याची सगळीकडे खूप चर्चा झाली होती. आता नवीन वर्षाच्या सुरूवातीला बॉलिवूड अभिनेत्री बिदिता बागने टॉपलेस फोटोशूट केले आहे. हे फोटोशूट तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

बिदिता बागने फोटो शेअर करत तिने म्हटले की, जसे की आता नवीन वर्षाचा काळ आहे आणि प्रत्येक जण आपल्या सुट्ट्यांचे फोटो अपलोड करत आहे. आपली बिकनी बॉडी फ्लॉन्ट करत आहे. २०२० माझ्यासोबत कित्येकांसाठी कठीण काळ राहिला आहे. मी कदाचित स्वतःसाठी काही विकत घेतले असेल. 

ती पुढे म्हणाली की, हॉट फोटो अपलोड करा, पण वेगळ्या पद्धतीच्या स्टाइलसोबत साडीत. बिकनीमध्ये कधीच अप्सराच्या रुपात येण्यासाठी मला प्रेरणा मिळाली नाही, पण माझे साडी प्रेम एक नवीन सिलसिला आहे. माझे साडीवर नेहमीच प्रेम आहे.

बिदिता बागने शेअर केलेले तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोत लोक बिदिताचे खूप कौतूक करत आहेत आणि फोटोवर कमेंट करत आहेत. बिदिता बागच्या या फोटोंवर आतापर्यंत लाखो लाइक्स आले आहे. 

बिदिता बाग सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे आणि नेहमी ती फोटो शेअर करत असते.

तिच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सध्या ती वेबसीरिज द मिसिंग स्टोनमध्ये दिसते आहे.

टॅग्स :कियारा अडवाणी