Join us

​ आयफानंतर संजूबाबा निघाला फिरायला..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2016 21:38 IST

स्पेनच्या मॅड्रिडमध्ये रंगलेला अभूतपूर्व असा आयफा अवार्ड सोहळा अनुभवल्यानंतर अनेक सेलिब्रिटी स्पेनमध्ये सुटी एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये आहेत. आपला संजूबाबा ...

स्पेनच्या मॅड्रिडमध्ये रंगलेला अभूतपूर्व असा आयफा अवार्ड सोहळा अनुभवल्यानंतर अनेक सेलिब्रिटी स्पेनमध्ये सुटी एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये आहेत. आपला संजूबाबा अर्थात संजय दत्त सहपरिवार आयफाला हजर होता. आयफाचा सोहळा एन्जॉय केल्यानंतर संजूबाबा पत्नी व मुलांसह इबिथाला रवाना झाला आहे. याठिकाणी कुटुंबीयांसोबत चिल्ड करण्याचा त्याचा बेत आहे. इबिथा हे स्पेनच्या अखत्यारितले आणि भूमध्य समुद्रातील बालेआरिक बेटांच्या स्वायत्त समुदायापैकी एक बेट आहे. हजारो पर्यटक याठिकाणी सुट्या घालवण्यासाठी येतात. संजूबाबाचाही हा बेत दिसतोय..एन्जॉय देन!!