Join us
Daily Top 2Weekly Top 5

'धुरंधर'नंतर अक्षय खन्नाचा अ‍ॅटिट्युड बदलला! 'दृश्यम ३'च्या लूकसाठी भलतीच डिमांड, फीमध्येही केली वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 09:40 IST

'धुरंधर'नंतर अक्षय खन्नाचा अॅटिट्युड वाढला असल्याचं बोललं जात आहे. अक्षय खन्नाने 'दृश्यम ३'साठी काही अटी ठेवत फीदेखील वाढवली आहे. 

'धुरंधर' सिनेमामुळे अक्षय खन्ना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अक्षय खन्नाने साकारलेल्या रहमान डकैतच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. 'धुरंधर'मुळे अक्षय खन्ना पुन्हा एकदा प्रसिद्धीझोतात आला आहे. त्याचं सिनेमातील एन्ट्री साँगही प्रचंड व्हायरल झालं आहे. पण, 'धुरंधर'नंतर अक्षय खन्नाचा अॅटिट्युड वाढला असल्याचं बोललं जात आहे. अक्षय खन्नाने 'दृश्यम ३'साठी काही अटी ठेवत फीदेखील वाढवली आहे. 

बॉलिवूड मशीनने दिलेल्या रिपोर्टनुसार, 'धुरंधर'च्या सक्सेसनंतर अक्षय खन्नाने त्याच्या फीमध्ये जबरदस्त वाढ केली आहे. याबरोबरच 'दृश्यम ३'मधील लूकसाठीही त्याने काही अटी ठेवल्या आहेत. अक्षय खन्नाच्या या मागणीमुळे 'दृश्यम ३'ची टीम आणि अभिनेत्यामध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. ज्यामुळे अक्षय खन्नाने 'दृश्यम ३'मधून काढता पाय घेतल्याचंही बोललं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, निर्माते आणि अक्षय खन्ना यांच्यातील हे मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, अद्याप याबाबत कोणतीही माहिती अधिकृतरित्या देण्यात आलेली नाही. सध्या तरी 'दृश्यम ३'मधून अक्षय खन्नाचा पत्ता कट झाल्याचं चित्र आहे. 

'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नासोबत रणवीर सिंग, संजय दत्त, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, आर माधवन यांच्या मुख्य भूमिका आहेत. ५ डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. १७ दिवसांत 'धुरंधर'ने ५५५ कोटींचा गल्ला जमवला आहे. मार्चमध्ये 'धुरंधर २' सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Akshay Khanna's attitude change after 'Dhurandhar'? Demands for 'Drishyam 3'.

Web Summary : Akshay Khanna's popularity surged after 'Dhurandhar,' reportedly leading to increased fees and demands for 'Drishyam 3,' causing potential conflicts with the film's team. His involvement is now uncertain.
टॅग्स :धुरंधर सिनेमाअक्षय खन्ना