Join us

आमिर खाननंतर आता हा प्रसिद्ध अभिनेता झाला सोशल मीडियापासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 17:47 IST

आमिरनंंतर आणखी एका अभिनेत्याने सोशल मीडियापासून दूर राहाण्याचे ठरवले आहे.

ठळक मुद्देसुशांत सिंहने द लेजंट ऑफ भगतसिंग, सत्या, दम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तसेच विरुद्ध या मालिकेत काम केले आहे. तसेच सावधान इंडिया या क्राईम शोचे सूत्रसंचालनही केले आहे.

आमिर खानने काल सोशल मीडियावर शेवटची पोस्ट टाकत तो सोशल मीडियाला रामराम ठोकत असल्याचे त्याने सांगितले. आता त्याच्यानंंतर आणखी एका अभिनेत्याने सोशल मीडियापासून दूर राहाण्याचे ठरवले आहे.

सुशांत सिंहने द लेजंट ऑफ भगतसिंग, सत्या, दम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तसेच विरुद्ध या मालिकेत काम केले आहे. तसेच सावधान इंडिया या क्राईम शोचे सूत्रसंचालनही केले आहे. त्याने आता सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित तो सोशल मीडियापासून दूर होत असल्याचे सांगितले आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे की, सोशल मीडियावरून मी ब्रेक घेत आहे. 

आमिर खानने त्याच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. त्याने या पोस्टमध्ये सांगितले होते की, ही त्याची शेवटची पोस्ट असून तो सोशल मीडियाला रामराम ठोकत आहे. त्याला त्याचे संपूर्ण लक्ष कामाकडे केंद्रित करायचे असल्याने त्याने हा निर्णय घेतला आहे. आमिरच्या आगामी चित्रपटांविषयी, तसेच त्याच्याविषयी अपडेट्स त्याच्या चाहत्यांना आमिर खान प्रोडक्शनच्या सोशल मीडिया हँडलवर पाहायला मिळतील.

आमिरने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले होते की, माझ्या वाढदिवसाला तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या प्रेमासाठी मी आभारी आहे. मला तुम्हाला एक बातमी सांगायची आहे की, ही माझी सोशल मीडियावरील शेवटची पोस्ट असणार आहे. तसाही मी सोशल मीडियावर खूपच कमी सक्रिय असतो आणि आता मी सोशल मीडिया पूर्णपणे सोडण्याचे ठरवले आहे. आमिर खान प्रोडक्शनच्या सोशल मीडिया हँडलवर माझ्याविषयी तुम्हाला जाणून घेता येईल. आपण पूर्वी ज्याप्रकारे संवाद साधत होतो, त्याप्रमाणे पुढे देखील मी तुमच्या संपर्कात असणार आहे.

टॅग्स :सुशांत सिंग