टायगर जिंदा है’ हा चित्रपट सलमान खानच्या २०१२ मध्ये आलेल्या ‘एक था टायगर’ चित्रपटाचा दुसरा भाग आहे. या भागात ‘एक था टायगर’ची पुढची स्टोरी दाखविण्यात येणार आहे. या भागातही सलमान आणि कॅटरिना जासूसची भूमिका साकारताना दिसणार आहेत. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती यशराज बॅनरअंतर्गत केली जात आहे. दिवाळीच्या मुहूर्ताला भाईजानने ‘टायगर जिंदा है’चे पहिले पोस्टर आऊट केले होते.
दिवाळीच्या एक दिवसआधी भाईजानने आपल्या tweeter अकाऊंटवर हे पोस्टर जारी करत जोरदार धमाका केला होता. दिग्दर्शक अली अब्बास जफरने एका गोष्टीची पूरेपूर काळजी घेतली आहे. ती म्हणजे, २०१२ मध्ये आलेल्या ‘एक था टायगर’चा फ्लेवर त्याच्या सीक्वलमध्येही जसाच्या तसा प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा, याकडे जफरने लक्ष दिले आहे. सलमान आणि कॅटरिनाचे सेटवरचे लीक झालेल्या फोटोंमध्ये दोघांची केमिस्ट्री बघायला मिळाली होती. कॅटरिनासाठी सलमान खान लकी चार्म ठरला आहे असे म्हटले तर वावगे ठरु नये. कारण टायगर जिंदा है चित्रपट साईन करताच आणखीन दोन मोठे चित्रपट तिच्या हाती लागले आहेत.