रजनीकांत व अक्षय कुमार स्टारर ‘2.0’ या चित्रपटाने छप्परफाड कमाई केली. ‘2.0’च्या यशानंतर अक्षय कुमार पुन्हा एकदा दिग्दर्शक शंकर यांच्यासोबत काम करण्यास सज्ज झाला आहे. खास बात म्हणजे, या चित्रपटातही अक्षय पुन्हा एकदा निगेटीव्ह रोलमध्ये दिसणार आहे. होय, या चित्रपटात अक्षय कुमार साऊथ सुपरस्टार कमल हासन यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे, ‘इंडियन 2’.‘इंडियन 2’ हा चित्रपट १९९४ मध्ये आलेल्या ‘इंडियन’चा सीक्वल आहे. ‘इंडियन’ या चित्रपटात कमल हासन, मनिषा कोईराला आणि उर्मिला मातोंडकर यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाने तीन राष्ट्रीय पुरस्कार पटकावले होते. आता या चित्रपटाचा सीक्वल येतोय. यातही कमल हासन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कालच दिग्दर्शक शंकर यांनी ‘इंडियन 2’चा फर्स्ट लूक जारी केला होता. ‘फिंगर क्रॉस’ केलेले कमल हासन या पहिल्या पोस्टरमध्य दिसले होते.
रजनीकांत यांच्यानंतर कमल हासनसोबत दिसणार अक्षय कुमार!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 12:49 IST
रजनीकांत व अक्षय कुमार स्टारर ‘2.0’ या चित्रपटाने छप्परफाड कमाई केली. ‘2.0’च्या यशानंतर अक्षय कुमार पुन्हा एकदा दिग्दर्शक शंकर यांच्यासोबत काम करण्यास सज्ज झाला आहे. खास बात म्हणजे, या चित्रपटातही अक्षय पुन्हा एकदा निगेटीव्ह रोलमध्ये दिसणार आहे.
रजनीकांत यांच्यानंतर कमल हासनसोबत दिसणार अक्षय कुमार!!
ठळक मुद्देइंडियन 2’ हा कमल हासन यांच्या करिअरमधला अखेरचा चित्रपट ठरणार आहे. कारण या चित्रपटानंतर अभिनय कायमचा सोडणार असल्याचे खुद्द कमल हासन यांनीच स्पष्ट केले होते.