Join us  

VIDEO: आदित्य नारायण घेऊन जात होता नवरी, सिग्नलवर किन्नरांच्या टोळीने कारला घेरलं आणि....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2020 10:27 AM

या क्लिपमध्ये आदित्य फुलांनी सजलेल्या कारमधून नवरीला घेऊन जात आहे. घरी जाताना कार एका सिग्नलवर थांबते आणि तिथे त्याला किन्नरांनी घेरा घातला आहे.

गायक आणि इंडियन आयडल १२ चा होस्ट आदित्य नारायणने नुकतंच गर्लफ्रेन्ड श्वेता अग्रवालसोबत लग्न केलं. १ डिसेंबरला दोघांनी एका मंदिरात लग्न केलं. या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशात त्यांचा एक वेगळा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यात तो किन्नरांकडून आशीर्वाद घेताना दिसत आहे.

या क्लिपमध्ये आदित्य फुलांनी सजलेल्या कारमधून नवरीला घेऊन जात आहे. घरी जाताना कार एका सिग्नलवर थांबते आणि तिथे त्याला किन्नरांनी घेरा घातला आहे. गाडीच्या आतून आदित्य किन्नरांना पैसे देतो. पण किन्नर आणखी जास्त पैशांची डिमांड करतात आणि तेवढ्यातच सिग्नल सुरू होतो.

आदित्यच्या वरातीचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. यातील एका व्हिडीओत तो मंडपात जाण्याआधी ढोलवर भांगडा करताना दिसतो आहे. आदित्य नारायण आणि श्वेताचं लग्न जुहूच्या इस्कॉन मंदिरात पार पडलं. या लग्नात ५० लोक सहभागी झाल्याचं समजतं. आदित्यचं लग्न मंदिरात झालं. पण त्याचं रिसेप्शन ५ स्टार हॉटेलमध्ये होणार आहे. त्याच्या रिसेप्शनसाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. 

टॅग्स :आदित्य नारायणबॉलिवूडलग्न