बॉक्स ऑफिसवर १६०० कोटी कमावणाऱ्या 'धुरंधर: द रिव्हेंज'ची जादू आता क्रिकेटच्या मैदानातील 'किंग'वरही चालली. भारतीय क्रिकेट टीमचा अष्टपैलू क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी-लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी नुकतंच 'धुरंधर: द रिव्हेंज' हा चित्रपट पाहिला. रणवीर सिंगचा दमदार अभिनय आणि आदित्य धरचं अंगावर काटा आणणारं दिग्दर्शन पाहून ही जोडी चित्रपटाच्या प्रेमात पडली आहे. अनुष्का आणि विराट दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपटाचं आणि टीमचं तोंडभरून कौतुक केलं आहे. या स्तुतीमुळे दिग्दर्शक आदित्य धर कमालीचा भारावला असून त्याने सोशल मीडियावर विराट-अनुष्काचे आभार मानत एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
विराटने पत्नी अनुष्कासोबत 'धुरंधर: द रिव्हेंज' पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर विराटने सोशल मीडियावर लिहिले की, "भारतात बनलेला यासारखा दुसरा कोणताही चित्रपट मी आजवर पाहिलेला नाही. जवळपास चार तास, मी माझ्या जागेवरून एका क्षणासाठीही हललो नाही". विराटच्या या पोस्टला उत्तर देताना आदित्य धर भावुक झाला. तो म्हणाला, "वा! हे खरं आहे, यावर माझा विश्वासच बसत नाही. विराट, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मी अंडर-१९ वर्ल्डकपपासून तुझा चाहता आहे. तू देशासाठी जे करतो, ते आम्हाला प्रेरणा देतं. आम्ही आमच्या चित्रपटांद्वारे भारताला अभिमान वाटावा यासाठी प्रयत्न करत राहू".
अनुष्काने चित्रपटातील रणवीर सिंग, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि राकेश बेदी यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक केले. यावर आदित्यने तिचे आभार मानत म्हटले की, "तुझ्यासारख्या प्रतिभावान व्यक्तीकडून कौतुक मिळणं ही खूप आनंदाची गोष्ट आहे. मनापासून धन्यवाद. यामुळे आम्हाला आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते".
विशेष म्हणजे, आदित्य धरचं पूर्वी क्रिकेटर बनण्याचं स्वप्न होते आणि तो क्रिकेटही खेळत होता. मात्र नंतर त्यानं फिल्म इंडस्ट्रीत करिअर करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, 'धुरंधर: द रिव्हेंज'ची घोडदौड थांबण्याचे नाव घेत नाहीये. आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात १६०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. आदित्य धरच्या या स्पाय युनिव्हर्सने बॉलिवूडमध्ये कमाईचे नवे निकष प्रस्थापित केले आहेत.
Web Summary : Virat Kohli and Anushka Sharma praised 'Dhurandhar: The Revenge,' prompting director Aditya Dhar's emotional response. Dhar, a fan since Virat's Under-19 days, expressed gratitude, vowing to make India proud through his films. Anushka lauded the actors' performances.
Web Summary : विराट कोहली और अनुष्का शर्मा ने 'धुरंधर: द रिवेंज' की प्रशंसा की, जिससे निर्देशक आदित्य धर भावुक हो गए। धर, विराट के अंडर-19 के दिनों से ही प्रशंसक हैं, उन्होंने आभार व्यक्त किया और अपनी फिल्मों के माध्यम से भारत को गौरवान्वित करने का वादा किया। अनुष्का ने कलाकारों के प्रदर्शन की सराहना की।