Join us

अदा की अदा...! हिचे बोल्ड फोटो पाहाल तर सनी, मलायकाला विसराल!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 13:40 IST

सध्या अदाचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

ठळक मुद्देनुकत्याच रिलीज झालेल्या ‘कमांडो 3’या सिनेमातही अदा झळकली होती.

बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत तिने आपल्या खास अदांनी प्रेक्षकांची मने जिंकलीत. आम्ही बोलतोय अभिनेत्री अदा शर्मा बद्दल. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘कमांडो 3’ या सिनेमात अदा जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स करताना दिसली. सध्या याच अदाचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.अदाने स्वत: हे फोटो शेअर केले आहेत. यात तिने अ‍ॅनिमल प्रिंटची मोनोकिनी घातली आहे. या मोनोकिनीतील अदाचे फोटो इतके हॉट आहेत की पाहणारे घायाळ होतील. हे फोटो शेअर करताना, अदाने ‘ग्लॅमरस सिरदर्द’ असे लिहिले आहे.

अदा शर्मा सोशल मीडियाच्या माध्यमातून  ती नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. स्वत:चे रोज नवे हॉट फोटो, व्हिडीओ ती शेअर करत असते. या फोटोंवर तिचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.

अदाने बॉलिवूडमध्ये २००८ साली आलेल्या ‘१९२०’ या सिनेमातून रुपेरी पडद्यावर एंट्री घेतली. यानंतर ‘हम है राही यार के’ आणि ‘हंसी तो फंसी’ या सिनेमातही तिने भूमिका साकारल्या.

नुकत्याच रिलीज झालेल्या ‘कमांडो 3’या सिनेमातही अदा झळकली होती. यात विद्युत जामवाल मुख्य भूमिकेत होता. याशिवाय अंगीर धर आणि गुलशन देवैया यासारखे कलाकार स्क्रीन शेअर करताना दिसले होते.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीत जरी अदा काम करत असली तरी तिचा जन्म मुंबईत झाला आहे. हिंदी, इंग्लिश आणि तमीळ भाषेचे चांगले ज्ञान तिला आहे.  

टॅग्स :अदा शर्मा