Join us

बोल्ड ड्रेस सावरताना ‘या’ अभिनेत्रीची झाली दमछाक, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2018 19:54 IST

मुंबईमध्ये आयोजित केलेल्या एका अवॉर्ड सोहळ्यात अतिशय बोल्ड ड्रेस घालून पोहोचलेल्या या अभिनेत्रीची ड्रेस सावरताना चांगलीच दमछाक झाली.

मुंबईतील हॉटेल ताजमध्ये गेल्या शनिवारी जीक्यू स्टाइल अवॉर्ड्स होस्ट करण्यात आले. ज्याठिकाणी बॉलिवूड अभिनेत्री सुरवीन चावला अतिशय बोल्ड अंदाजात बघावयास मिळाली. तिने काळ्या रंगाचा हाय स्लिट गाउन घातला होता. ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज बघण्यासारखा होता. परंतु जेव्हा ती रेड कार्पेटवर उतरली तेव्हा मात्र तिला या ड्रेसमध्ये स्वत:ला सावरणे खूपच अवघड झाले होते. ती वारंवार आपला ड्रेस सावरत असताना दिसली. वास्तविक सुरवीनने घातलेला गाउन ट्यूब पॅटर्नमध्ये होता. त्यातच तो लूज असल्याने तिला वारंवार तो सावरावा लागला. त्याचबरोबर हाय स्लिट असल्याने तिला चालताना चांगल्याच अडचणी येत होत्या. बºयाचदा तर तिने एका हाताने गाउन सावरत चालणे पसंत केले. असे करताना तिच्या चेहºयावरील ताण स्पष्टपणे दिसून येत होता. दरम्यान, या अवॉर्ड सोहळ्यात शाहिद कपूर, आलिया भट्ट, निधी अग्रवाल, नुसरत बरूचा, अक्षयकुमार, हुमा कुरेशी, नोरा फतेही, मोहित मारवाह, अमित साध, इसाबेल कैफ, मंदाना करीमी, राहुल बोस, कबीर बेदी, अरुणोदय सिंह, क्रिकेटर रोहित शर्मा यांच्यासह इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित होते.