Join us

‘या’ अभिनेत्रीचाही हॉट योगा करतानाचा फोटो इंटरनेटवर होतोय व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 16:15 IST

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री रिया सेन हिने हॉट योगा करतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. आता या अभिनेत्रीनेही असाच काहीसा फोटो शेअर करून खळबळ उडवून दिली आहे.

अभिनेत्री शमा सिकंदर नेहमीच तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. तिचे इन्स्टाग्राम अकाउंट बोल्ड फोटोंनी अक्षरश: भरलेले आहे. आता तिने पुन्हा एकदा असाच काहीसा बोल्ड फोटो अपलोड करून खळबळ उडवून दिली आहे. शमाने हॉट योगा करतानाचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा शमा चर्चेत आली आहे. दरम्यान, शमाप्रमाणे अभिनेत्री रिया सेन हिनेही तिचा असाच काहीसा बिकिनीवर हॉट योगा करतानाचा फोटो शेअर केला होता. रिया सध्या गोव्यात पतीसोबत व्हेकेशन एन्जॉय करीत आहे. रियाचा हा फोटो इंटरनेटवर व्हायरल होत असतानाच शमाचा हा फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये शमा रेड बिकिनीमध्ये समुद्राच्या किनाºयावर बसून योगा करताना दिसत आहे. शमाने तिचा हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘अब दिल की सुन!’ शमाचा हा फोटो तिच्या चाहत्यांकडून चांगलाच पसंत केला जात आहे.  काही दिवसांपूर्वी शमाने असाच काहीसा बोल्ड फोटो शेअर केला होता. ज्यामुळे युजर्सनी तिला ट्रोल केले होते. मात्र शमाने ट्रोलर्सला जशास तसे उत्तर देण्यासाठी आणखी एक बिकिनी फोटो शेअर केला होता. हा फोटो पोस्ट करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘प्रत्येक महिलेजवळ स्तन असतात. ज्यामुळे त्या पुरुषांपेक्षा वेगळ्या असतात. मला गर्व आहे की मी एक महिला आहे.’शमाने पुढे लिहिले होते की, माझ्याकडेदेखील ते सर्व आहे. तुम्ही त्यास वेगळे नाव देऊ शकता. माझा हा संदेश त्या सर्व ट्रोलर्सकरिता आहे, जे माझ्या शरीराच्या अवयवांना विविध नावे ठेवत असतात. शमाच्या या हटके पोस्टमुळे ट्रोलर्सची बोलती बंद झाली.