Join us

​या अभिनेत्याच्या मुलीचे तेराव्या वर्षी झाले होते अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 17:15 IST

दीपक तिजोरीने नवव्दीच्या दशकात सडक, खिलाडी, जो जिता वही सिकंदर यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो अभिनयानंतर ...

दीपक तिजोरीने नवव्दीच्या दशकात सडक, खिलाडी, जो जिता वही सिकंदर यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो अभिनयानंतर दिग्दर्शन आणि निर्मितीकडे वळला. त्याने फरेब, टॉम डिक अँड हॅरी या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. तसेच तो बिग बॉसमध्येदेखील झळकला होता. दीपक नुकतेच दिग्दर्शक निरज वोराच्या अंतिम यात्रेत दिसला होता. त्यावेळी दीपकला ओळखणे देखील कठीण झाले होते. दीपकचे वजन कित्येक किलो वाढले असून त्याने दाढी, मिशी वाढवलेली आहे.दीपक गेल्या काही दिवसांपासून एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आहे. दिपकची पत्नी शिवानीने त्याला घराच्या बाहेर काढले आहे. दिपकचे एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध असल्याने त्याला घराच्या बाहेर काढण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे. तो गेल्या काही दिवसांपासून त्याच्या मित्रांसोबत अथवा पेइंग गेस्ट म्हणून राहात असल्याचा दावा एका वेबसाईटने केला होता. दिपकला शिवानी घरात घेत नसल्याने तो नुकताच एका काऊन्सिलरकडे गेला होता. पण तिथे गेल्यावर एक वेगळीच गोष्ट त्याच्या लक्षात आली आहे की, कायद्याने त्याचे आणि शिवानीचे लग्नच झालेले नाही. दिपकसोबत लग्न करण्याआधी शिवानीचे लग्न झालेले होते आणि तिने तिच्या पूर्व पतीला घटस्फोट न देताच दिपकसोबत लग्न केले होते. त्यामुळे हे लग्न कायद्याने वैध ठरत नाही असे काऊन्सिलरचे म्हणणे आहे. या दोघांना २१ वर्षांची मुलगी आणि एक मुलगा आहे. दीपकच्या मुलीचे नाव समायरा असून वयाच्या तेराव्या वर्षी तिचे अपहरण झाले होते. एका मुलाखती दरम्यान दीपकनेच ही गोष्ट सांगितली होती. समायराचे अपहरण १० मे २००९ ला झाले होते. समायरा अंधेरीतील लोखंडवाला येथून चालत असताना जबरदस्तीने काही लोकांनी तिला ऑटोमध्ये बसवले होते आणि तिला हॉटेलमध्ये घेऊन गेले होते. पण त्यांचे लक्ष नाही हे पाहाताच समायराने तिथून पळ काढला होता. समायरा ही देखील सध्या इंडस्ट्रीशी संबंधित आहे. तिने वरुण धवन आणि जॉन अब्राहमच्या ढिश्शूम या चित्रपटासाठी काम केले आहे.