Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘सेक्रेड गेम्स २’च्या शूटिंगवेळी प्रेग्नेंट होती ‘ही’ अभिनेत्री ; एका सीन वेळी अशी झाली होती स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 18:24 IST

‘सेक्रेड गेम्स २’ या चित्रपटाच्या एका सीनच्या चित्रीकरणाच्यावेळी झालेला एक किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 

हॉट अ‍ॅण्ड ब्युटीफुल अभिनेत्री सुरवीन चावला हिने तीन महिन्यांपूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. तीन महिन्याच्या बाळाची आई असूनही ती अलीकडेच पूलमध्ये चिल करताना आढळून आली. तिने साकारलेल्या वेगवेगळया चित्रपटातील भूमिकांची  चाहत्यांनी वाहवाच केली. तिने नुकताच ‘सेक्रेड गेम्स २’ या चित्रपटाच्या एका सीनच्या चित्रीकरणाच्यावेळी झालेला एक किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 

लवकरच सुरवीन चावला ‘सेके्रड गेम्स २’ मध्ये दिसणार आहे. पहिल्या सीझनमध्ये तिने जोजोची भूमिका साकारली आहे. या पहिल्या सीझनच्या शूटिंगवेळी ती प्रेग्नंट होती. एका सीनच्या शूटिंगवेळी तिची कशी अवस्था झाली होती हे सांगताना ती म्हणते,‘मी प्रेग्नंट असल्याने मी जोजोची भूमिका करताना खूप लवकर थकून जात होते. जोजोची भूमिका करणं माझ्यासाठी खूपच कठीण काम होतं. अशावेळी माझे मनोबल ढासळत होते. तसेच मला कधी कधी वाटत होतं की, तिथून निघून जावं.’

‘सेक्रेड गेम्स २’ १५ ऑगस्टला रिलीज होणार आहे. ‘सेक्रेड गेम्स’ मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीने गणेश गायतोंडे ही भूमिका साकारली होती. आता त्याच्या भूमिकेत सैफ अली खान दिसणार आहे. सुरवीन तिच्या डोहाळजेवणाच्या फोटोंमुळे मध्यंतरी प्रचंड चर्चेत होती. 

टॅग्स :सुरवीन चावलासॅक्रेड गेम्स