Join us  

बॉलिवूड सोडून सनी लिओनी होणार UP पोलिसांत भरती? अभिनेत्रीचं ॲडमिट कार्ड व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 9:39 AM

Sunny Leone: सनीच्या नावाचं व्हायरल होत असलेलं ॲडमिट कार्ड बनावट असल्याचं समोर आलं आहे.

पॉर्नइंडस्ट्रीला रामराम करत बॉलिवूडची वाट धरणारी अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी (Sunny Leone). गेल्या काही वर्षांपासून सनी कलाविश्वात चांगलीच सक्रीय आहे. सिनेमा, म्युझिक अल्बम यांच्या माध्यमातून ती सातत्याने चर्चेत येत असते. मात्र, यावेळी ती उत्तर प्रदेश पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या परिक्षेमुळे चर्चेत आली आहे. या परिक्षेसाठी चक्क सनी लिओनीचं ॲडमिट कार्ड तयार झाल्याचं समोर आलं आहे. सध्या सोशल मीडियावर सनीचं हे ॲडमिट कार्ड व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेश पोलीस कॉन्स्टेबलच्या 60244 पदांच्या भरतीसाठी दोन दिवसांची परीक्षा घेण्यात येणार आहे. या परिक्षेसाठी असंख्य उमेदवार बसले होते.  १७ फेब्रुवारी रोजी ही परीक्षा अनेक केंद्रांवर घेण्यात आली. यामध्येच कनौज जिल्ह्यात एक ॲडमिट कार्ड समोर आलं. हे ॲडमिट कार्ड चक्क सनी लिओनीच्या नावाचं होतं. इतकंच नाही तर त्यावर फोटोदेखील तिचा होता. त्यामुळे सध्या देशभरात सनी लिओनीची चर्चा रंगली आहे. 

या ॲडमिट कार्डनुसार, या उमेदवाराला उत्तर प्रदेशातील तिर्वा येथील श्रीमती सोनाश्री मेमोरियल गर्ल्स कॉलेजमध्ये परीक्षा द्यायची होती. उमेदवारांच्या यादीत या उमेदवाराचं नाव पाहिल्यावर सगळ्यांनाच धक्का बसला. तसंच  कोणीतरी चेष्टा करण्याच्या हेतून हे केल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, हे ॲडमिट कार्ड व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलीस भरती आणि पदोन्नती बोर्डाकडून हे प्रवेशपत्र बनावट असल्याचं सांगितलं आहे. 

टॅग्स :सनी लिओनीबॉलिवूडउत्तर प्रदेशसेलिब्रिटीपोलिस