बॉलिवूडमध्ये एकेकाळी हिट सिनेमे देणारी अभिनेत्री आता कमबॅक करत आहे. १३ वर्षांनंतर ती पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. लग्न, दोन मुलांच्या जन्मानंतर आता लेकाच्याच सांगण्यावरुन ती कमबॅकसाठी सज्ज आहे. सोहेल खानसोबत तिचा 'मैन दिल तुझको दिया' सिनेमा खूप गाजला होता. काही सिनेमे दिल्यानंतर ती स्क्रीनपासून दूर झाली होती. कोण आहे ही अभिनेत्री?
हिंदी तसंच साउथ सिनेमांमध्ये झळकलेली ही अभिनेत्री आहे समीरा रेड्डी (Sameera Reddy). 'दे दना दन', 'वन टू थ्री', 'वेदी', 'वेट्टई' अशा अनेक हिट सिनेमांमध्ये ती दिसली. २००८ साली आलेल्या 'रेस'मध्येही ती होती. तर २०१२ साली आलेल्या 'तेज' सिनेमात ती शेवटची दिसली. आता ती 'चिमनी' सिनेमातून कमबॅक करत आहे. हा निर्णय घेण्यामागचं कारण सांगताना ती म्हणाली, "माझ्या मुलाने रेस सिनेमा पाहिला.त्याने मला विचारलं, 'आई आता तू अशी दिसत नाहीस. तू अभिनय का करत नाहीस?' मी म्हणाले, 'कारण मी तुझ्या आणि तुझ्या बहिणीच्या पालनपोषणात व्यस्त होते.' मग त्यानेच मला पुन्हा काम करण्यासाठी आत्मविश्वास दिला. त्याच्याच सांगण्यावरुन मी फिल्म इंडस्ट्रीत कमबॅक करण्याचा निर्णय घेतला."
समीरा पुढे म्हणाली, "मी फिल्म सेटवर थोडी घाबरले होते. लोक सतत म्हणत होते, 'तुम्ही तर एक्सपर्ट आहात'. तेव्हा मी मनात म्हणायचे की यांना काय सांगू माझी ही आता नव्याने सुरुवात आहे. पण जसं मी अॅक्शन ऐकलं माझ्या आतली अभिनेत्री जागी झाली. दिग्दर्शकाच्या सांगण्यांनुसार मी तसं काम केलं."
वैयक्तिक आयुष्याबद्दल
समीरा रेड्डी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. ती आपल्या सासूसोबत रील शेअर करत असते. समीराने २०१४ साली बिझनेसमन अक्षय वर्देसोबत लग्न केलं. अक्षय हा मराठी कुटुंबातला आहे. २०१५ साली समीराने मुलाला जन्म दिला. त्याचं नाव हंस असं ठेवलं. तर २०१९ साली तिला मुलगी झाली. तिचं नाव नायरा असं आहे. मुलांच्या जन्मानंतर समीराचं वजन कमालीचं वाढलं होतं. सोशल मीडियावर अनेकांनी तिला ट्रोल केलं. तेव्हा तिने वजन घटवण्याचं चॅलेंज घेतलं. आता ती पुन्हा ग्लॅमरस लूकमध्ये समोर आली आहे.