Join us  

सुपरस्टार आईवडिलांची ४६ वर्षीय लेक झाली फ्लॉप, आता इंग्लंडमध्ये जगतेय आलिशान आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 5:18 PM

अभिनेत्रीच्या लेक लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारित आहे.

मनोरंजनविश्वात जुना काळ गाजवणारे अनेक दिग्गज कलाकार आहेत. आज त्यांची मुलं, नातवंडंही सिनेइंडस्ट्रीत आली आहेत. काहींना आईवडिलांप्रमाणेच यश मिळालं तर काही मात्र सपशेल अपयशी ठरलेत. अशीच एक अभिनेत्री आहे जिचे आई वडील आणि बहीणीनेही इंडस्ट्रीत नाव कमावलं. मात्र ती स्वत: कायम अपयशीच ठरली. कोण आहे ती अभिनेत्री जाणून घ्या.

'जिस देश मे गंगा रहता है' या गोविंदाच्या सिनेमात दिसलेली हिरोईन आठवतेय का? तिचं नाव आहे रिंकी खन्ना आहे. भारतीय सिनेइंडस्ट्रीतील पहिले सुपरस्टार अभिनेते राजेश खन्ना (Rajesh Khanna) आणि डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) यांची रिंकी मुलगी आहे. रिंकी (Rinke Khanna) आणि तिची बहीण ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत इंडस्ट्रीत आल्या. यामध्ये ट्विंकलला सुरुवातीला बऱ्यापैकी यश मिळालं मात्र रिंकी कायम फ्लॉपच ठरली. रिंकी राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची धाकटी लेक आहे.

रिंकी खन्नाने आपल्या करिअरची सुरुवात 1999 साली 'प्याय मे कभी कभी' या सिनेमातून केली होती. सिनेमातील गाणी हिट झाली पण सिनेमा मात्र फ्लॉप झाला. यानंतर गोविंदासोबतचा 'जिस देस मे गंगा रहता है' सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला नाही. प्रेक्षकांना रिंकी आणि गोविंदाची जोडी आवडली नाही. यानंतर रिंकी 'ये है जलवा','प्राण जाए पर शान जाए','झंकार बीट्स' आणि 'चमेली' या सिनेमांमध्ये दिसली. हे चारही चित्रपट सपशेल आपटले. यानंतर तिने तमिळ सिनेमा केला तोहा फ्लॉप झाला.

रिंकीने पदार्पणानंतर चारच वर्षात करिअरला रामराम केला. तिने सलग ६ फ्लॉप सिनेमे दिले आणि ती स्क्रीनपासून दूर झाली. प्रसिद्ध व्यावसायिक समीर सरन यांच्यासोबत ती लग्नबंधनात अडकली. लग्नानंतर रिंकी कायमची यूकेला स्थायिक झाली. रिंकीने दोन मुलींना जन्म दिला. सध्या ती कुटुंबासोबत यूकेमध्येच असते तसंच आई आणि बहिणीला भेटण्यासाठी बऱ्याचदा भारतात येते.

टॅग्स :राजेश खन्नाडिम्पल कपाडियाबॉलिवूडपरिवारसिनेमा