Join us

हे काय?  चक्क रस्त्याच्या कडेला फुटपाथवर प्रियंका चोप्राने दिल्या हॉट पोज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 13:09 IST

प्रियंकाच्या नव्या फोटोशूटची चर्चा...

ठळक मुद्देप्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलाल तर ती हॉलिवूडचा चित्रपट ‘मॅट्रिक्स’च्या चौथ्या भागात दिसू शकते.

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा कपड्यांमुळे कायम चर्चेत असते. अगदी काही दिवसांपूर्वी प्रियंकाचा ग्रॅमी अवॉर्डमधील ड्रेस पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. हा ड्रेस इतका रिलिव्हिंग होता की, यावरून ती ट्रोल झाली होती. यानंतरही तिच्या या डीप नेक गाऊनची अनेक दिवस चर्चा होती. आता प्रियंका तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. होय, प्रियंकाने नुकतेच हार्पर बाजार या मॅगझिनच्या सिंगापूर एडिशनसाठी ग्लॅमरस फोटाशूट केले. ते सुद्धा ट्रॅफिकने गजबजलेल्या रस्त्यावरच्या एका फुटपाथवर.

या फोटोशूटचे व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओत प्रियंका रस्त्याच्या कडेला एका फुटपाथवर उभी होत हॉट पोज देताना दिसतेय.

अन्य एका व्हिडीओत ती ब्लॅक कलरच्या ट्रान्सपरेंट ड्रेसमध्ये पोज देतेय. मॅगझिनसाठी प्रियंकाने एकापेक्षा एक हॉट पोज दिल्या आहेत.

सध्या प्रियंकाजवळ बॉलिवूडचा एकही सिनेमा नाही. अलीकडे ‘स्काय इज पिंक’ या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये कमबॅक केले होते. पण भारतीय प्रेक्षकांनी तिच्या या कमबॅकची फारसी दखल घेतली नाही. साहजिकच बॉक्सआॅफिसवर चित्रपटाला अपेक्षित यश मिळाले नाही. अर्थात येत्या काही दिवसांत हॉलिवूडच्या काही प्रोजेक्टमध्ये तिची वर्णी लागू शकते.

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलाल तर ती हॉलिवूडचा चित्रपट ‘मॅट्रिक्स’च्या चौथ्या भागात दिसू शकते. गेल्या काही दिवसांपासून प्रियंका व निर्मात्यांमध्ये या संदर्भात बातचीत सुरू आहे. आता ही चर्चा शेवटच्या टप्प्यात आली आहे. ही चर्चा यशस्वी झाली तर तर लवकरच देसी गर्ल या प्रोजेक्टची घोषणा करण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :प्रियंका चोप्रा