Join us

लग्नाआधीच नीना गुप्ता राहिल्या होत्या प्रेग्नंट, क्रिकेटर विवियन रिचर्डसच्या मुलीला दिला जन्म, सिंगल माता बनत केला सांभाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 13:43 IST

वेस्ट इंडियाचे माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्ससोबत लग्न न करता प्रेग्नंट राहिलेल्या नीना यांनी आपल्या बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या या निर्णयाने भारतात जणू खळबळ उडाली. त्याकाळात कुणीच त्यांची सोबत दिली नाही.

नीना गुप्ता या एक अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी गंभीरपासून ते विनोदी भूमिकांपर्यंत सर्व भूमिका साकारल्या आहेत. नजदीकिया, मंडी, उत्सव, डॅडी, तेरे संग, दिल से दिया वचन अशा अनेक चित्रपटांत त्या झळकल्या. नीना गुप्ता आपल्या पर्सनल लाईफला घेऊन देखील तितक्याच चर्चेत राहिल्या. 

वेस्ट इंडियाचे माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्ससोबत लग्न न करता त्यांच्या मुलीला जन्म देण्याचा निर्णय त्यांनी घेतला . 8० च्या दशकात हा निर्णय मुळातचं क्रांतिकारी निर्णय होता. वेस्ट इंडिजची टीम भारतात खेळायला आली. त्याचदरम्यान विवियन आणि नीना एकमेकांना भेटले आणि या पहिल्या भेटीत ते एकमेकांच्या प्रेमात पडले. खरे तर विवियन त्यावेळी विवाहित होते. पण ना नीना यांनी त्याची पर्वा केली, ना विवियन यांनी. दोघांचीही संस्कृती, आचार-विचार, आयुष्य सगळे काही भिन्न होते. विवियन नीना यांच्या प्रेमात आकंठ बुडाला होते. पण त्यांना आपले लग्नही तोडायचं नव्हते. त्यामुळे त्यांनी नीनासोबत लग्न करण्याचा विचार बाजूला केला.  लग्न न करता प्रेग्नंट राहिलेल्या नीना यांनी आपल्या बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या या निर्णयाने भारतात जणू खळबळ उडाली. त्याकाळात कुणीच त्यांची सोबत दिली नाही. सुरूवातीला त्यांच्या स्वत:च्या कुटुंबानेही त्यांना जवळ केले नाही. नीना प्रेग्नंट असताना त्यांच्या आईचे निधन झाले. यानंतर मात्र नीनाच्या वडिलांनी मुलीला आधार दिला. ते दिल्लीहून मुंबईला मुलीसोबत राहायला आलेत.

नीना गुप्ता त्यांच्या आणि  विवियन रिचर्ड् यांच्या नात्यावर म्हणाल्या होत्या की, 'माझ्याकडे मसाबा आहे कारण माझं विवियनवर प्रेम आहे. जर तुम्ही कुणावर र प्रेम करत असला तर आपण  त्याच्यावर रागावू शकत नाही. आपण एकत्र राहू शकत नाही किंवा एकत्र गोष्टी करू शकत नाही  हे हळूहळू आपल्या लक्षात येते. पण आपण द्वेष करू शकत नाही. असं नाही की जर आज प्रेम असेल तर उद्या लग्न.

1989 मध्ये नीना यांनी मुलीला जन्म दिला. कुमारी माता बनण्याच्या नीनांच्या या निर्णयावर त्यावेळी प्रचंड टीका झाली. पण नीना डगमगल्या नाहीत. नीनाने सिंगल पॅरेंट बनून मसाबाचे संगोपन केले. कारण मसाबाच्या जन्मानंतर विवियन व नीना यांच्या आयुष्यात बराच बदल झाला. हळूहळू दोघांच्या भेटी कमी झाल्यात. त्यांच्यात दुरावा आला. पुढे दोघांनीही एकमेकांपासून दूर होण्याचा निर्णय घेतला. अर्थात विवियनने नीनांसोबत संबंध तोडले तरी पित्याचे कर्तव्य मात्र निभवले. विवियनकडून एकार्थाने धोका मिळाल्यानंतर नीना यांनी एकटीच्या बळावर मसाबाला घडवले. आज मसाबा बॉलिवूडची नामवंत फॅशन डिझाईनर म्हणून ओळखली जाते. 

टॅग्स :नीना गुप्ता